आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी दिल्लीच्या AIIMS मध्ये दाखल आहेत. बुधवारी रात्रीपासून ते लाइफ सपोर्ट सिस्टमवर आहेत. वाजपेयी हे राजकारणातील महत्त्वाचे व्यक्ती आहेत. देशभरात त्यांचे अनेक चाहते आहेत. परंतू स्वतः अटल बिहारी वाजपेयी हे अभिनेत्री आणि भाजपा खासदार हेमा मालिनीचे खुप मोठे चाहते आहेत. स्वतः हेमा मालिनी यांनी त्यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा शेअर केला होता.
हेमा मालिनीसोबत मान खालीकरुन बसले होते अटल बिहारी वाजपेयी
2017 मध्ये हेमा मालिनी यांनी अटलजी यांच्या 93 व्या वाढदिवशी सांगितले होते की, त्यांना 'सीता और गीता' चित्रपट एवढा आवडला होता की, त्यांनी तो 25 वेळा पाहिला होता. एवढेच काय तर ते पहिल्यांता हेमा भेटले तेव्हा बोलताना संकोच करत होते. त्यावेळी वाजपेयीजी पुर्ण वेळ मान खाली करुन बसलेले होते. हेमा यांनी सांगितले होते की, "जेव्हा राजकारणात आल्यानंतर मी ऑफिशिअलस् म्हणाले की, मी माझ्या स्पीचमध्ये अनेक वेळा अटलजी यांचे नाव घेतले आहे. परंतू आतापर्यंत माझी त्यांच्यासोबत भेट झालेली नाही. यानंतर मला त्यांना भेटवण्यासाठी नेण्यात आले. मीटिंग दरम्यान बोलताना बाजपेयीजींना संकोच वाटत होता."
- "ज्यावेळी मी तिथे उपस्थित असलेल्या महिलेला विचारले की, अटलजी माझ्याशी प्रॉपर पध्दतीने का बोलत नाहीये. तेव्हा तिने मला सांगितले की, अटलजी तुमचे खुप मोठे फॅन आहेत. 1992 मध्ये त्यांनी तुमचा 'सीता और गीता' 25 वेळा पाहिला होता. याच कारणामुळे आज अचानक तुम्हाला समोर पाहून त्यांना संकोच वाटत आहे."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.