आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क: भारत रत्न आणि तीन वेळा पंतप्रधान राहिलेले अटल बिहारी वाजपेयी आता आपल्यात नाहीत. गुरुवारी संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अटल बिहारी यांना खाण्याचा शौक होता. परंतू आरोग्य चांगले राहावे यासाठी त्यांना स्ट्रिक्ट डायट प्लान फॉलो करावा लागत होता. वरिष्ठ पत्रकार राशिद किदवई यांनी अटल बिहारी वाजपेयी आणि त्यांचा खाण्याचा किस्सा शेअर केला. त्यांनी सांगितले की, एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान जेवणाच्या काउंटरकडे जात होते. तिथे गुलाब जामुन ठेवलेले होते. यामुळे त्यांच्या जवळच्या लोकांना कळत नव्हते की, त्यांना कसे थांबवावे. ते टेंशनमध्ये आले. पंतप्रधान असल्यामुळे त्यांना डायरेक्टर खाऊ नका असे बोलता येत नव्हते. तेव्हा सहका-यांनी एक युक्ती सुचवली. कार्यक्रमात माधुरी दीक्षित उपस्थित होती. तेव्हा सहका-यांनी त्याच वेळी माधुरी दीक्षितला वाजपेयींकडे पाठवले. तेव्हा वाजपेयी माधुरीसोबत चित्रपटांविषयी बोलू लागले. बोलता बोलता वाजपेयी यांचे जेवणावरुन दुर्लक्ष झाले. तोपर्यंत सकरा-यांनी तिथून गुलाब जामून आणि मिठाई काढून ठेवली.
पकौडे आणि मसाला चहा आवडत होती
वायपेयीसोबत काम केलेल्या लोकांनी सांगितले की, ते खाण्याचे खुप शौकीन होते. ते जेथे जात होते, तेथील स्थानिक पदार्थांची चव नक्कीच चाखत होते. त्यांना कोलकाता येथील पुचका, हैदराबादची बिरयानी आणि हलीम, लखनऊचे गलावटी कबाब खुप आवडायचे. वाजपेयी यांना चाट मसल्यासोबत पकोडे आणि मसाला चहा खुप आवडायची.
हैदराबादवरुन येत होते 'झींगा' आणि लखनऊमधून येत होते 'कबाब'
एका जवळच्या सहका-याने सांगितले की, मंत्रीमंडळ बैठकी दरम्यान वाजपेयी खा-या भूईमुगाच्या शेंगा खायचे. त्यांची प्लेट रिकामी होताच ती पुन्हा भरुन ठेवली जात होते. एका जवळच्या सहका-याने सांगितले की, लालजी टंडन त्यांच्यासाठी लखनऊच्या चौक भागातील कबाब घेऊन यायचे. सध्याचे केंद्रीय मंत्री विजय गोयल त्यांच्यासाठी जुन्या दिल्लीतील बेडमी आलू आणि चाट घेऊन यायचे. तर वैंकया नायडू हैदराबादचे झींगे आणायचे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.