आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन, एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान भारतरत्न  अटल बिहारी वाजपेयी यांनी गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. युरीन इन्फेक्शनमुळे अटलजींना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी रात्री त्यांची प्रकृती अधिक बिघडली. एम्सने बुधवारी रात्री अटलजींचे मेडिकल बुलेटिन जारी केले. त्यानुसार गेल्या 24 तासांत त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर गुरुवारी सकाळी जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्येही त्यांची प्रकृती बुधवारप्रमाणे चिंताजनक असल्याचे मेडिकल बुलेटिनमध्ये स्पष्ट करण्यात आले. पण सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आले. 

 

UPDATES

>> एम्सच्या मेडिकल बुलेटिनमध्ये वाजपेयींच्या निधनाचे वृत्त

>> माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही एम्समध्ये जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारणा केली. 

Delhi: Congress President Rahul Gandhi arrives at AIIMS (All India Institute of Medical Sciences) where former PM #AtalBihariVaajpayee is admitted. He is on life support system. pic.twitter.com/fP7Gq9Hdrv

— ANI (@ANI) August 16, 2018

 

>> अनेक राज्यांचे मुख्यमंत्री दिल्लीकडे रवाना तर काही दिल्लीमध्ये दाखल.

>> सुमारे 40 मिनिटे थांबून पंतप्रधान एम्समधून परत गेले. 

>> शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी संध्याकाळी दिल्लीला रवाना होणार. 

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एम्समध्ये दाखल झाले. 

 

Delhi: PM Narendra Modi arrives at AIIMS where #AtalBihariVaajpayee is admitted. The former PM is on life support system pic.twitter.com/JnT67YIEc9

— ANI (@ANI) August 16, 2018
>> देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ, ममता बॅनर्जी असे अनेक राज्यांचे मुख्यमंत्री दिल्लीकडे रवाना झाले आहेत. 

 

>> अरविंद केजरीवाल यांनी एम्समध्ये जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची चौकशी केली. 

>>अमित शहांसह अनेक नेते भाजप मुख्यालयात पोहोचले. भाजप मुख्यालयावरील फुलांचे हार काढण्यात आले. 

 

गुरुवारी सकाळपासूनच अनेक बडे नेते एम्समध्ये अटलजींना भेटण्यासाठी पोहोचत होते.  उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू सकाळी 6.30 वाजता अटलजींना बेटण्यासाठी एम्समध्ये पोहोचले होते. त्यानंतर नऊ वाजेच्या सुमारास अमित शहा यांनीही अटलजींच्या प्रकृतीची चौकशी केली. बुधवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही एम्समध्ये पोहोचले होते. मोदी याठिकाणी सुमारे 40 मिनिटे एम्समध्ये होते. त्याआधी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी, पीयूष गोयल, सुरेश प्रभू, हर्षवर्धन, जितेंद्र सिंह आणि अश्विनी कुमार चौबे यांनीही एम्समध्ये पोहोचत अटलजींच्या प्रकृतीची चौकशी केली होती. 

 

लाल किल्ल्यावर भाषणात मोदींनी काढली आठवण 

बुधवारी सकाळी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाजपेयींची आठण काढली होती. मोदी म्हणाले, काश्मीर मुद्द्यावर तोडगा काढताना आम्ही अटलजींच्या मार्गावर चालू. हा मार्ग म्हणजे इन्सानियत, कश्मीरियत आणि जम्हुरियतवर आधारित होता. 

 
2009 पासून बिगडली प्रकृती 
2009 मध्येही वाजपेयींची प्रकृती बिघडली होती. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. अनेक दिवसांच्या त्रासानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेण्यात आले होते. पण नंतर सर्वकाही सुरळीत झाले. त्यानंतर वाजपेयींना अर्धांगवायू झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ते कोणाशी बोलत नव्हते. नंतर त्यांना स्मृतीभ्रंश झाल्याने ते फार लोकांना ओळखतही नव्हते. 

 
तीन वेळा पंतप्रधान 
वाजपेयी सर्वात आधी 1996 मध्ये वाजपेयी 13 दिवसांसाठी पंतप्रधान बनले. बहुमत सिद्ध करता आले नाही म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला. ते दुसऱ्यांदा 1998 मध्ये पंतप्रधान बनले. पण सहकारी पक्षांनी पाठिंबा मागे घेतल्याने 13 महिन्यांनी 1999 मध्ये पुन्हा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. 13 ऑक्टोबर 1999 मध्ये ते तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले. त्यानंतर त्यांनी 2004 पर्यंत कार्यकाळ पूर्ण केला. डिसेंबर 2014 मध्ये अटलजींचा भारतरत्न जाहीर करण्यात आला. मार्च 2015 मध्ये  तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी प्रोटोकॉल तोडत वाजपेयींना त्यांच्या घरी जाऊन भारतरत्नने सन्मानित केले. 

बातम्या आणखी आहेत...