आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटलजींनी दहशतवादाच्या मुद्यावर संपूर्ण जगाला भारताच्या बाजुने उभे केले-मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतरत्न आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत काश्मिरबाबत नेहमी उत्तर देत असतो. प्रत्येकवेळी भारताला या मुद्द्यावर घेरण्याचा प्रयत्न केला जातो. पण अटलजींनी दहशतवादाच्या मुद्द्यावर संपूर्ण जगाला भारताच्या बाजुने उभे करण्यात यश मिळवले होते. 

 

#WATCH live from Delhi: PM Narendra Modi addresses the prayer meeting for #AtalBihariVajpayee. https://t.co/JcF2sZeYZU

— ANI (@ANI) August 20, 2018

अटलजींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सर्वपक्षीय सभेमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, भाजपाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, अमर सिंह, तृणमूलचे खासदार डेरेक ओ ब्रायनसह अनेक नेते उपस्थित होते. 

 


कोण काय म्हणाले...
नरेंद्र मोदी - जीवन किती असावे हे आपल्या हातात, नसते पण ते कसे असावे हे आपल्या हाती असते. अटलजींनी त्यांच्या जीवनातून जीवन का आणि कसे असावे हे दाखवून दिले. आयुष्यभर ते सामान्य व्यक्तीसाठी जगत राहिले. 
 
लालकृष्ण अडवाणी - माझी वाजपेयींबरोबर 65 वर्षांची मैत्री राहिली. मी त्यांच्याबरोबर अनेक अनुभव घेतले. आम्ही एकत्र चित्रपट पाहयचो, पुस्तके वाचायचो बरेच काही करायचो. मला धडा देणाऱ्यांमध्ये अटलजी सर्वात आघाडीवर आहेत. मी आज जे काही आहे ते अटलजींमुळेच आहे. 

 

राजनाथ सिंह - अटलजींची प्रतिमा आजही अटल आहे. ते आपल्यात नाहीत याची जाणीवच होत नाही. ते पंतप्रधान झाले म्हणून लोकप्रिय झाले नाहीत. ते आधीपासूनच लोकप्रिय होते. 


देशभरात होणार सभा
अटलजींच्या स्मृतीमध्ये देशभरात श्रद्धांजली सभांचे आयोजन केले जाणार आहे. रविवारी अटलजींच्या अस्थींचे गंगेमध्ये विसर्जन करण्यात आले. यावेळी अमित शहा, राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत उपस्थित होते. सर्व राज्यांमध्ये अटलजींचे अस्थिकलश पाठवले जाणार आहेत. 
 

पुढे पाहा, श्रद्धांजली सभेत उपस्थित नेत्यांचे PHOTOS

बातम्या आणखी आहेत...