आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटलजींचे 5 चर्चित किस्से...‘३ बुलाए, १३ आए; दे दाल में पानी’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1) इतिहास बदलू शकताे, भूगोल नाही  (१९९९)

लाहाेर दाैऱ्यादरम्यान तेथे गव्हर्नर हाऊसमधील भाषणात वाजपेयी म्हणाले हाेते- ‘तुम्ही मित्र बदलू शकता, शेजारी नाही’; इतिहास बदलू शकता, भूगोल नाही.’ त्यांचा हा किस्सा खूपच चर्चेत राहिला.


2) ३ बुलाए, १३ अाए; दे दाल में पानी (१९७९)

अटलजी आग्र्यात असताना डाळीचे संकट निर्माण झाले हाेते. तेव्हा ते म्हणाले- डाळही माझ्यासारखीच अाहे. पाहुणे आल्यावर ‘३ बुलाए, १३ आए; दे दाल में पानी’सारखी स्थिती होते.


3)  बडे बेअाबरू हाेकर हम तेरे कूचे से निकले (१९८५)

ग्वाल्हेरमध्ये लोकसभा निवडणुकीत ४५ हजार मतांनी मागे पडल्यानंतर अापला पराभव स्वीकार करताना म्हणाले- सिंधीयांना शुभेच्छा! तसेच समर्थकांना म्हणाले- ‘भूखे भजन न होय गोपाला, चल चलें चंबल की शाला।’ (कारण त्यांच्यासाेबतच समर्थकही उपाशीपाेटी बसले हाेते.) असेही म्हणाले- ‘बडे बेअाबरू हाेकर हम तेरे कूचे से निकले।’


4) भजनलाल संपूर्ण भजन मंडळासह काँग्रेसमध्ये कीर्तन करण्यास गेले (१९८०)

भजनलाल संपूर्ण मंत्रिमंडळासह कॉंग्रेसमध्ये गेले तेव्हा अटलजी म्हणाले- ‘भजनलाल संपूर्ण भजन मंडळासह कांॅग्रेसमध्ये कीर्तन करण्यास गेले. त्यावर तेथे उपस्थित नागरिकांत एकच हशा पिकला. अटलजी असेच सर्वांना हसवत असत.


5) नारी नंबर एक, बाकी सर्व दस नंबरी (१९७५)

कॉंग्रेस आय बनल्यावर त्यांनी पक्षाला इंदिरा आय असे संबोधित केले. आणीबाणीनंतर कॉंग्रेस पक्षात नंबर दोनच्या स्थितीवर कटाक्ष टाकत म्हणाले की- ‘इंदिरा गांधी नंबर एक, नंबर दोन अाहे काेण? केवळ नंबर एक, नंबर दोन काेण अाहे, नारी नंबर एक, बाकी सर्व दस नंबरी’


6) पाय हलवून कुणी भाषण देताे काय ? 
एकदा तर इंदिरा गांधींनी अटलजींवर टीका करताना म्हटले हाेते की, ‘ते खूप हात हलवून बाेलतात. त्यानंतर अटलजी उत्तर देताना म्हणाले की,‘ते तर ठीक अाहे; परंतु तुम्ही कुणाला पाय हलवून बाेलताना पाहिले अाहे काय?’

बातम्या आणखी आहेत...