आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परराष्ट्र मंत्री असताना येथे पेढे खाण्यासाठी जायचे अटलजी, लाडू ठरले होते पासपोर्ट टू पीएम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1977 मध्ये परराष्ट्र मंत्री असताना अटलबिहारी वाजपेयी. - Divya Marathi
1977 मध्ये परराष्ट्र मंत्री असताना अटलबिहारी वाजपेयी.

ग्वाल्हेर - माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. अटलजी तीन वेळा देशाचे पंतप्रधान राहिलेले आहेत. राजकारणाशिवाय त्यांच्या खासगी जीवनाबाबत बोलायचे झाल्यास अटलजी हे खवय्ये होते. चविष्ट पदार्थ चाखण्याची त्यांना आवड होती. ग्वाल्हेरच्या शिंदे छावणीत जन्मलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांची आवडीची मिठाई 'बहादुरा चे लाडू' आणि चिवडा होते. 

 

लाडू बनले पासपोर्ट टू पीएम
>> बहादुरा स्वीट्स दुकानाच्या मालकांनी सांगितले की, अटलजी पंतप्रधान बनल्यानंतर जेव्हा कोणी ओळखीचा व्यक्ती दिल्लीला त्यांना भेटायला जायचा, तेव्हा ते पंतप्रधानांसाठी लाजू नक्की घेऊन जायचे. एका इंग्रजी वृत्तपत्राने हे लाडू म्हणजे 'पासपोर्ट टू पीएम' म्हटले होते. 
>> त्यांनी सांगितले की, अटलजी लहान असताना अनेकदा पायी चालत त्यांच्या दुकानात लाडू खाण्यासाठी जायचे. त्यावेळी हे लाडू 4-6 रुपये किलो होते ते आता 400 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. 


खोडकर होते वाजपेयी 
सुमारे चार वर्षांपूर्वी अटल बिहारी वाजपेयींचे शेजारी आणि बालमित्र मनराखन मिश्र यांनी एखा मुलाखतीत सांगितले होते की, अटलजी लहानपणी फार खोडकर होते. आर्थिक तंगी असूनही ते शहरातील खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असेलल्या दुकानांवर जायचे. अनेकदा अटलजी त्यांना बळजबरी इमरती खाऊ घालायचे. एक दोन आण्यांची इमरती खाऊन ते निघून जायचे. त्यानंतर मित्रांनी पैसे द्यायला सांगितले की ते लांब जाऊन उभे राहायचे. त्यामुळे मित्रांनाच पैसे द्यावे लागायचे. 


स्पेशल चिवडा आवडीचा 
- सिटीच्या फालका बाजार येथील नमकीनचे व्यावसायिक सुन्नूलाल गुप्ता 'बेडर' यांचेही अटलजी ग्राहक होते. याठिकाणी ते स्पेशल चिवडा खायला यायचे. एकदा परराष्ट्र मंत्री असताना अटलजी ग्वाल्हेरला आले होते. ते येणार होते, पण उशीर होत असल्याने ते आज येणार नाही असे गुप्ता यांना वाटले. पण रात्री 2 वाजता पोलिसांची गाडी सायरन वाजवत दुकानासमोर येऊन उभी राहिली. त्यातून अटलदी उतरले आणि म्हणाले, मी अटल बिहारी चिवडा तयार आहे? लगेचच ते आले आणि त्यांनी चिवडा तयार करून त्यांना दिला. त्यानंतर अटलजींनी त्यांना किमतीपेक्षा जास्त पैसे दिले. 


मंगोडे-बालुशाहीही आवडायची 
- अशाच प्रकारे दौलत गंज आणि किलागेटजवळील बजाजखाना मधील बालुशाहीच्या दुकानावर ते नेहमी जात. 
- या दुकानात सध्या असणाऱ्या दुसऱ्या पिढीतील लोक सांगतात की, अटलजी त्यांच्या दुकानावर येत होते. ते मंगोडे आणि बालुशाही खायचे असे त्यांचे पूर्वज सांगायचे. 

बातम्या आणखी आहेत...