आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना पेट्रोल चालणारा स्कूटर; 7 इंचचे टच-स्क्रीन मीटर आणि रिव्हर्स गिअर, तसेच नेव्हिगेशन सिस्टम आणि 75 km चे आहे मायलेज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ऑटो डेस्क : भारतात सध्या ई-स्कूटरची मोठी क्रेझ आहे. सरकारने देखील पर्यावरण संरक्षणासाठी ई-स्कूटरला प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांवर जास्तीचे कर लावण्याची योजना आखली आहे. यामुळे पेट्रोल-डिझेल गाड्यांच्या किंमती महाग होणार आहे. अशातच अनेक ऑटोमोबाइल कंपन्या इलेक्ट्रिक गाड्यांची निर्मिती करत आहेत. बंगऴुरु येथील ऑटोमोबाइल स्टार्टअप कंपनी अथर एनर्जी (Ather Energy)ने यावर्षी आपले पहिले ई-स्कूटर Ather S340 लाँच केले होते. या स्कूटरची बंगऴुरु येथील ऑनरोड किंमत 1,09,750 रूपये आहे. यामध्ये रजिस्ट्रेशन, इंश्योरंस आणि स्मार्ट कार्डचा समावेश करण्यात आलेला आहे. या ई-स्कूटरमध्ये अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारे टच-स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिले आहे.

 


अथर एनर्जी स्कूटरचे फीचर्स

> या स्कूटरमध्ये अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारे टच-स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहे. हे पूर्णपणे वाटरप्रूफ आणि डस्टप्रूफ असणार आहे. 
> यामध्ये पुश नेव्हिगेशन, पार्किंग असिस्ट सिस्टम, वाटरप्रूफ चार्जर, मल्टीपल रायडिंग मोड्स सारखे फीचर्स असणार आहेत. 
> याच्या इन्फोटेनमेंट सिस्टममध्ये आपण ड्राइव्हिंग लायसेंस, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट सारखे कागदपत्रे अपलोड करू शकता. 
> स्कूटरमध्ये लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. एकदा फुल चार्ज केल्यावर स्कूटर 75 किमी पर्यंतचा प्रवास करू शकतो. 
> ही बॅटरी 50 मिनिटात 80% चार्ज केले जाईल. तसेच स्कूटरची टॉप स्पीड 80kmph आहे. 
> ही स्कूटर 3.9 सेकंदात 0 ते 40 Kmph ची स्पीड पकडत असल्याचा कंपनीचा दावा आहे. 
> रिमोट डायग्‍नोस्‍टि‍क्‍स, स्टॅलाइट नेव्हिगेशनसोबतच फ्रंट आणि रिअर डिस्क ब्रेक आणि टेलि‍स्‍कॉपि‍क फ्रंट सस्‍पेंशन दिलेले आहे. 
> रिव्हर्स घेण्यासाठी यामध्ये रिव्हर्स गिअर सिस्टम देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...