आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Athlete Hima Das Is Busy In Preparation For Tokyo Olympics, Can't Give Time For Biopic Research Team

अॅथलीट हिमा दास टोकियाे ऑलिम्पिकच्या तयारीत व्यस्त, बायोपिकसाठी रिसर्च टीमला नाही देऊ शकत वेळ 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : भारतीय तरुण अॅथलीट हिमा दास सध्या चर्चेत आहे. गेल्या एका महिन्यात तिने पाच सुवर्णपदक जिंकले आहेत. तरुणासाठी प्रेरणादायी ठरलेली हिना गेल्या एका वर्षापासून निर्मात्यांचीदेखील आवडती बनली आहे. अक्षय कुमार आणि रीमा कागतीपासून ते ओमप्रकाश मेहरा तिच्यावर बायोपिक बनवण्यासाठी तयार आहेत. हिमा दासच्या जवळच्या लोकांनुसार अनेक निर्माते, तिच्याकडून अधिकार घेण्यासाठी उताविळ आहेत. आपल्या संघर्षाची कथा पडद्यावर यावी अशी हिमाचीदेखील इच्छा आहे. मात्र सध्या निर्मात्यांना यासाठी वाट पाहावी लागणार आहे. कारण हिमाकडे सध्या वेळ नाही. ती पुढच्यावर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक खेळावर लक्ष देत आहे. 

 

हिमाचे लक्ष्य सध्या खेळावर...  
अनेक निर्माते आणि दिग्दर्शक हिमासोबत तिच्या आयुष्यावर संशोधन करू पाहत आहेत.मात्र हे काम पुढच्या वर्षांपर्यंत होल्डवर गेले आहे. याचे कारण हिमा सध्या टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक खेळावर लक्ष देत आहे. ते पुढच्या वर्षी होणार आहे. तिचे लक्ष सध्या या खेळावर आहे, त्यामुळे सध्या तिच्याकडे यासाठी वेळ नाही. निपुण दास, हिमाचे कोच

 

- हिमाच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेसाठी श्रद्धा कपूरच्या नावाची चर्चा होत आहे. दोघीची अंगकाठी सारखी आहे. 
- 05 सुवर्णपदके जिंकली हिमाने एका महिन्यात 
- 01 वर्षापूर्वी अक्षयने केली होती घोषणा 
- 11 महिन्यांपासून करत होते संशोधन 

 

दमदार आहे कथा... 
हिमा मुलांसोबत वडिलांच्या शेतात फुटबॉल खेळत होती. जवाहर नवोदय विद्यालयाच्या पीटी टीचरने तिला रेसर बनण्याचा सल्ला दिला. पैशाच्या अभावामुळे तिच्याकडे चांगले बूटदेखील नव्हते. स्थानिक कोच निपूणदास यांचा सल्ला ऐकून तिने जेव्हा जिल्ह्या पातळीवरील १०० किंवा २०० मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले तेव्हा कोचदेखील चकित झाले. त्यानंतर निपुण दास हिमाला घेऊन गुवाहाटीला आले, त्यानंतर हिमाने मागे वळून पाहिले नाही. 

 

हे चित्रपटदेखील आहेत रांगेत... 
- अरुणिमा सिन्हा (पर्वतारोही) : आलिया भट्‌ट 
- सय्यद अब्दुल रहीम (फुटबॉल कोच ) : अजय देवगण 
- मिताली राज (क्रिकेटर) : तापसी पन्नू 
- दीपा मलिक (पॅरालिम्पिक शॉट पुट) : सोनाक्षी सिन्हा 
- दुती चंद (अॅथलिट) : कंगना रनोट 
- पीटी उषा (अॅथलिट) : कॅटरिना कैफ 
याव्यतिरिक्त बॅडमिंटन स्टार सायना नेहवालच्या बायोपिकवर आधीच काम सुरू आहे. यात परिणीती चोप्रा काम करणार आहे. 

 

या कारणांनी आकर्षित केले 
- हिमाची आतापर्यंत कथा निर्मात्यांना आवडली. 
- अशा प्रकारच्या बायोपिकला चांगले यश मिळते आतापर्यंत 'भाग मिल्खा भाग', 'दंगल' आणि 'धोनी' बायोपिकला मिळाले आहे. 
- हिमाच्या प्रवासात संघर्ष आणि यश दोन्ही आहे. 
- तिचा संघर्ष लोकांसाठी प्रेरणा ठरेल अशी निर्मात्यांची इच्छा आहे. 
- अशा प्रकारच्या चित्रपटात देशभक्ती पाहायला मिळते, असे तज्ञांचे मत आहे.