आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 वर्षांची चिमुकली आहे आशियातील पहिली सिक्स पॅक्स असलेली लहान मुलगी, ऑलिंपिक गोल्ड मेडल जिंकण्याचे आहे स्वप्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर(राजस्थान)- वय फक्त 8 वर्षे, पळण्याची आवड आणि सिक्स पॅक्स अॅब्स. स्पव्न आहे 2024 मध्ये ओलिंपीक मेडल जिंकण्याचे. ही गोष्ट आहे इंस्टाग्राम फेम अॅथलीट पुजा बिश्नोईची. या वयातच तिने सिक्स पॅक्स अॅब्स बनवले आहेत, यावरूनचे तिची खेळाप्रतीची आवड दिसते. उसेन बोल्टप्रमाणे मोठी अॅथलिट बनण्याचे तिचे स्वप्न आहे. लहान वयातच सिक्स पॅक्स अॅब्स बनवणरी ही भारतातील पहिली मुलगी जोधपूरच्या गुडा-बिश्नोई गावात राहते. 


मुलीचे मामा आहेत कोच
पुजाचे मामा श्रवण बिश्नोई तिचे कोच आहेत. सा लहानशा वयात सिक्स पॅक्स अॅब्स बनवण्याची आणि पळण्याची जिद्द त्यांनीच पुजाला दिली. इंस्टाग्रामवर पुजाच्या जिद्दीला पाहून विराट कोहली फाउंडेशनने तिच्या प्रवासाचा, न्यूट्रिशन, ट्रेनिंग इत्यादी खर्च करण्याचे ठरवले आहे. 


पुजाचे यश 
> सिक्स पॅक्स अॅब्सबाली आशियातील पहिली सर्वात लहान मुलगी.
> 3 किलोमीटर फक्त 12.50 मिनीटात पार करते. 
> 10 किलोमीटर मॅराथॉन 48 मिनीटात पार करते.


रोज 8 तास प्रॅक्टिस 
4 वर्षांपासून तिने प्रॅक्टिस करणे सुरू केले होते. ती रोज सकाळी 3 वाजता उठून प्रॅक्टिस करते. 3-4 तासांच्या प्रॅक्टिसनंतर सकाळी 7 वाजता शाळेत जाते. त्यानंतर संध्याकाळी परत रनिंगची प्रॅक्टिस करते. रोज जवळजवळ 8 तास प्रॅक्टीस करते.
 

कुलदीपमध्येही बहिणीप्रमाणे जिद्द
कोच आणि मामा श्रवण सांगतात की, पुजाप्रमाणे तिचा लहान भाऊ कुलदीपमध्येही रनिंगची जिद्द आहे. त्यांची आईची मला आंतराष्ट्रीय अॅथलीट बनवण्याची ईच्छा होती, पण ते होऊ शकले नाही. आता आपला मुलांमध्ये ती ते स्वप्न पाहते.

बातम्या आणखी आहेत...