Home | Business | Business Special | ATM Card can give your family two lakh after death as life insurance

ATM कार्डमध्ये लपला आहे 2 लाखांचा विमा! जाणून घ्या कसा करावा, किती दिवसांत मिळेल हा Claim

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 06, 2018, 12:21 AM IST

जर तुमच्याकडे रूपे एटीएम कार्ड असेल तर ते केवळ पैसे काढण्यासाठी उपयोगी असल्याचा तुमचा समज असेल.

 • ATM Card can give your family two lakh after death as life insurance

  युटिलिटी डेस्क - जर तुमच्याकडे रूपे एटीएम कार्ड असेल तर ते केवळ पैसे काढण्यासाठी उपयोगी असल्याचा तुमचा समज असेल. पण या एटीएम कार्डाचे आणखीही काही फायदे आहेत. आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत की रूपे कार्डाचे आणखी काय काय फायदे आहेत. प्रत्येकाकडे स्वत:चे बॅंकेचे खाते असावे, असे सरकारचे धोरण आहे. यासाठी जन-धन अंतर्गत अनेक बँक खाती उघडण्यात आली. या माध्यमातून अनेकांपर्यंत रूपे एटीएम कार्ड पोहचले. या रूपे कार्डाचा वापर व्हावा आणि लोक याबाबत जागरुक व्हावेत यासाठी सरकारने या कार्डाचे अनेक फायदे लोकांना देण्याचा निर्णय घेतला.


  असा मिळेल 2 लाखाच्या विम्याचा फायदा?
  एटीएम कार्ड धारकांना आपो-आप बँकेकडून 2 लाख रुपयांचा विमा दिला जातो. मोदी सरकारने आता ही योजना रूपे कार्ड धारकांसाठी सुद्धा रूपे विमा कार्यक्रम अंतर्गत सुरु केली आहे. यामध्ये ज्या खाते धारकांकडे प्रीमियम रूपे कार्ड आहे त्यांना 2 लाखांचा विमा देण्यात येणार आहे. यासाठी तुमच्याकडून कोणतेही शुल्कही आकारण्यात येणार नाही.


  कसा मिळेल एक लाखाचा विमा?
  जर तुमच्याकडे नॉन प्रिमियम रूपे कार्ड आहे तर रूपे विमा कार्यक्रमातंर्गत तुमचा एक लाख रुपयांचा विमा होईल. त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.


  कशा पध्दतीचा असेल विमा?
  हा अपघात विमा असेल. जर तुमचा अपघाती मृत्यू झाला अथवा तुमच्या शरिराचा एखादा अवयव निकामी झाला तर तुम्हाला 1 ते 2 लाखादरम्यानची रक्कम मिळेल. नैसर्गिक मृत्यू झाल्यास तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही.


  कोणत्या कंपनीचा असेल हा विमा?
  नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने न्यू इंडिया इंन्शुरन्स कंपनी लिमिटेडसोबत याबाबत एक करार केला आहे. या करारअंतर्गत तुम्हाला न्यू इंडिया कंपनीचा विमा मिळेल.


  पुढे वाचा: किती दिवसांत करावा आणि कधी मिळेल क्लेम?

 • ATM Card can give your family two lakh after death as life insurance

  किती दिवसांत करावा लागेल क्लेम?
  जर तुमच्यासोबत कोणता अपघात झाला तर तुम्हाला 90 दिवसांच्या आत क्लेम करावा लागेल. जर तुमची स्थिती खुपच गंभीर असाल आणि तुम्ही कोणताही क्लेम करण्याच्या स्थितीत नसाल तर न्यू इंडिया इंन्शुरन्स कंपनी याची चौकशी करेल आणि याबाबतचा निर्णय घेईल. अपघाताची सूचना दिल्यानंतर 60 दिवसात तुम्हाला कागदपत्रे सादर करावी लागतील. 

 • ATM Card can give your family two lakh after death as life insurance

  10 दिवसात मिळेल क्लेम
  तुम्ही कागदपत्रे जमा केल्यावर 10 दिवसात क्लेमची रक्कम जारी करणे ही विमा कंपनीची जवाबदारी आहे. याबाबत तुम्ही अधिक माहिती हवी असल्यास खाली क्लिक करा 

   

  https://www.pmjdy.gov.in/files/QuickLinks/Circular-RuPay-Insurance-Program-2017-18.pdf

Trending