एटीएममध्ये भरण्यास दिलेले ३१ लाख घेऊन कर्मचारी फरार

एटीएममध्ये रक्कम भरण्यास काम दिलेल्या एजन्सीतील कर्मचारी  ३१ लाख ३ हजार ३०० रुपये घेऊन फरार झाल्याचे उघडकीस आले आहे.

प्रतिनिधी

Mar 13,2019 10:40:00 AM IST

पुणे - एटीएममध्ये रक्कम भरण्यास काम दिलेल्या एजन्सीतील कर्मचारी ३१ लाख ३ हजार ३०० रुपये घेऊन फरार झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधित एजन्सीच्यावतीने महेश पावडे (३४,रा.आंबेगाव-बुद्रुक,पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या कंपनीतर्फे विविध बॅकांच्या एटीएममध्ये रोख रक्कम भरण्याचे व व्यवस्थापनाचे काम करण्यात येते. त्यांची कंपनी शहरातील ९५० एटीएम मशीनसाठी हे काम करते. त्यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्याने कंपनीतर्फे दिलेले रोख ३१ लाख ३ हजार ३०० रुपये एटीएम मशीनमध्ये न भरता अपहार केला.याप्रकरणी पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.


ऑटोरिक्षाच्या धडकेत पुण्यात दुचाकीस्वार ठार
ऑटो रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना ३ मार्च रोजी कोरेगाव पार्क परिसरात घडली होती. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात रिक्षा चालकाविरोधात कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस हवालदार अर्जुन कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. हमीद हुसेन शेख (५५ रा.कोंढवा-खुर्द, पुणे) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस ऑटो रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत.

X
COMMENT