रिझर्व्ह बँकेचे परिपत्रक / फेल एटीएम-ई ट्रान्झॅक्शन : पैसे जमा न झाल्यास प्रतिदिन १०० रु. मिळणार

बँकेने स्वत:हून घेतली दखल, १५ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी
 

वृत्तसंस्था

Sep 22,2019 09:47:55 AM IST

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेने वेळेवर ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा केल्यास दंडही निश्चित केला आहे. रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार निश्चित वेळेत फेल रकमेचे पेमेंट होत नसेल तर बँकांना संबंधित ग्राहकास प्रतिदिन १०० रुपयांच्या हिशेबाने दंड द्यावा लागेल. परिपत्रकात नमूद केले की, ग्राहकांना या नियमानुसार लाभ न मिळाल्यास रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करू शकतात. हा नियम १५ ऑक्टोबर २०१९ पासून लागू होणार आहे.


भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. आरबीआयने फेल ट्रान्झॅक्शनशी संबंधित टर्न अराउंड टाइम(टीएटी) नियमांत बदल केला आहे. या बदलानंतर बँक ग्राहकांना फेल ट्रान्झॅक्शनच्या पैशासाठी जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, अशा प्रकरणांची स्वत:हून दखल घेत ग्राहकाच्या खात्यात पैसे जमा होतील. बँकांना तक्रारीविना ग्राहकांना पैसे परत करावे लागतील. बँकांकडे तक्रार केल्यानंतरही पैसे परत मिळत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारीनंतर रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने एटीएम आणि अन्य इलेक्ट्रिक देय व्यवहार निष्फळ झाल्यानंतर बँकांसाठी ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा अवधी निश्चित केला आहे. बँक खात्यातून पैसे कापले जात असतील आणि एटीएममधून रोकड मिळत नसेल तर अशा प्रकरणांत बँकेस ट्रान्झॅक्शनच्या पाच दिवसांच्या आत ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा करावे लागतील.


पॉइंट ऑफ सेल आणि आधार आधारित देयातून फेल ट्रान्झॅक्शनसाठी पाच दिवसांपर्यंत अवधी दिला आहे. कार्डातून कार्डास किंवा कार्डाद्वारे देयकावर बँकांसाठी एका दिवसाचा अवधी निश्चित केला आहे.

X
COMMENT