आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अकोला- 12 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश (दुसरे)एम. आय. आरलँड यांच्या न्यायालयाने ४० वर्षीय आरोपीला दोषी ठरवत 10 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निकाल न्यायालयाने बुधवारी दिला.
24 एप्रिल 2018 रोजी आरोपी गजानन किसन आडदाळे (40) याने शौचास जाणाऱ्या 12 वर्षीय मुलाचा पाठलाग केला. शौचालयातच मुलाला 500 रुपये आमिष देण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाने विरोध केला असता त्याला मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्यावर जबरदस्ती करून अनैसर्गिक कृत्य केले. घरी गेल्यानंतर मुलाने त्याच्यावर गुदरलेला प्रसंग बहिणीला सांगितला. त्यानंतर त्याचे आईवडिलांनी जुने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी आरोपी गजानन आडदाळे याच्याविरुद्ध आरोपीविरुद्ध पोस्को 7, 8, 9, 10, 11 व 12, भादंवि कलम 377, 323, नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पीएसआय रामराव राठोड यांनी केला. त्यांनी न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली.
13 साक्षीदार या प्रकरणात तपासण्यात आले. न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आरोपीला दोषी ठरवत कलम 377 नुसार 10 वर्षे शिक्षा, 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्याची अतिरिक्त शिक्षा, कलम 323 नुसार एक वर्षे कारावास, दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याची शिक्षा, पोस्को कलम 7, 8 नुसार पाच वर्षे शिक्षा, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त शिक्षा, पोस्को कलम 9,10 नुसार सात वर्षे शिक्षा, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त शिक्षा, पोस्को कलम 11,12 नुसार तीन वर्षे शिक्षा, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्या वतीने सहायक जिल्हा व सरकारी वकील मंगला पांडे यांनी काम पाहिले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.