आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅट्रॉसिटीमध्ये अधिक निर्दोष ठरतात म्हणजे प्रकरणे खोटी होती असे नव्हे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अॅट्रॉसिटी कायद्यात एखाद्या आरोपीला तत्काळ अटक करण्यासंबंधीची दुरुस्ती आणि गुन्ह्यातील तरतूद पुन्हा जोडण्याच्या निर्णयाचे केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात समर्थन केले आहे. या निर्णयामागे कोणत्याही प्रकारे राजकीय लाभ घेण्याचा हेतू नाही, असे केंद्राने युक्तिवाद करताना स्पष्ट केले. 


सुप्रीम कोर्टात म्हणणे मांडताना केंद्राने स्पष्ट केले की, अॅट्रॉसिटी कायद्यानुसार दाखल खटल्यांत बहुतांश गुन्हेगार निर्दोष सुटतात याचा अर्थ लोक खोटे गुन्हे दाखल करतात असे नव्हे. याला पुष्टी म्हणून केंद्र सरकारने  अत्याचाराची आकडेवारी कोर्टात मांडली.

 

देवकीनंदन ठाकूर यांना अटक
अॅट्रॉसिटी कायद्यातील दुरुस्तीच्या विरोधात आंदोलन पुकारून चर्चेत आलेले धार्मिक नेते देवकीनंदन ठाकूर यांना पोलिसांनी कलम १४४चे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून अटक केली. वाहनांच्या ताफ्यासह ते श्री पीतांबरा पीठात दर्शनासाठी आले होते. ते मंदिराबाहेर येताच पोलिसांनी त्यांना अटक केली. नंतर सोडून दिले.

बातम्या आणखी आहेत...