आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन युवतीचे अपहरण करून अत्याचार; गर्भपात ही केल्याची तक्रार, युवकाविरुध्द गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका सतरा वर्षीय युवतीचे शहरातीलच परिचित युवकाने वर्षभरापूर्वी अपहरण केले. त्यानंतर काही दिवस ते सोबत राहिले. या दरम्यान युवकाने अत्याचार केला तसेच गर्भपातही केला. इतकेच नाही तर त्याने मारहाण केल्याची तक्रार युवतीने बुधवारी (दि. ८) फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात केली. तक्रारीवरून पोलिसांनी युवकाविरुध्द गंभीर गुन्हे दाखल केले आहे. 


विजयकुमार रमेश चंद्र चौधरी (२२, रा. फ्रेजरपुरा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. फ्रेजरपुरा ठाण्याच्याच हद्दीत राहणाऱ्या एका सतरा वर्षीय युवतीला विजयकुमार चाैधरीने ६ सप्टेंबर २०१७ ला पळवून नेले होते. त्यानंतर मारण्याच्या धमक्या देवून वारंवार तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. दरम्यान युवतीला गर्भधारणा झाली. ही बाब विजय कुमारला माहीत झाल्यानंतर त्याने पिडीत युवतीला गोळ्या देवून तिचा गर्भपात करून घेतला. तसेच त्याने मारहाणही केल्याचा आरोप पिडीत युवतीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. दरम्यान अपहरण करण्यापूर्वी म्हणजेच २०१६ पासूनच युवतीचा शाळेत जाताना येताना विजयकुमार चौधरी हा पाठलाग करत असल्याचे पीडितेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. 


दरम्यान युवतीने दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी सायंकाळी फ्रेजरपुरा पोलिसांनी विजयकुमार चौधरीविरुध्द अपहरण करणे, बलात्कार, विनयभंग, गर्भपात करणे, मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे तसेच पोस्को (बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम) या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अलिकडे अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 


गुन्हा दाखल करून युवकाचा शोध केला सुरू 
अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केला असून विजयकुमार चौधरीचा शोध घेत आहोत. लवकरच त्याला अटक करण्यात येईल. 
- आसाराम चोरमले, ठाणेदार फ्रेजरपुरा. 

बातम्या आणखी आहेत...