आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हर्षवर्धन जाधव त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे सतत चर्चेत असतात

औरंगाबाद- काही दिवसांपूर्वीच मनसेत घरवापसी केलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. एका व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यामुळे सतत काहीना काही कारणाने वादाच्या भोवऱ्यात असलेले हर्षवर्धन जाधव परत एकदा चर्चेत आले आहेत.

फिर्यादी व्यक्तीची हर्षवर्धन जाधव यांच्या जमिनीच्या प्लॉट शेजारी टपरी होती. ती टपरी तिथेून हटवण्यासाठी जाधव यांनी शिवीगाळ करत धमकी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यानंतर व्यक्तीने पोलिसांकडे लेखी तक्रार देत जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला.
 

बातम्या आणखी आहेत...