Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | ATS arrest khultab doctor in aurangabad

खुलताबादचा डॉक्टर एटीएसच्या ताब्यात, ‘त्या’ 9 जणांच्या संपर्कात असल्याचा संशय

प्रतिनिधी | Update - Mar 05, 2019, 09:32 AM IST

इसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात राहून  घातपात करण्याच्या संशयावरून एटीएसने  मुंब्रा वऔरंगाबादमधून नऊ तरुणांना अटक

  • ATS arrest khultab doctor in aurangabad

    औरंगाबाद | इसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात राहून घातपात करण्याच्या संशयावरून एटीएसने मुंब्रा वऔरंगाबादमधून नऊ तरुणांना अटक केली होती. त्यांच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून सोमवारी एटीएसने खुलताबाद येथील एका डॉक्टरला ताब्यात घेतले. दिवसभर डॉक्टरची कसून चौकशी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात इसिसच्या संपर्कात आलेले काही तरुण अन्न आणि पाण्यात विष कालवून घातपात करणार असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती.


    या प्रकरणी मुंब्रा व औरंगाबादमधून नऊ संशयितांना अटक झाली होती. सध्या हे नऊ जण न्यायालयीन कोठडीत आहेत. खुुलताबादेतील एक डॉक्टर या संशयितांच्या संपर्कात असल्याच्या माहितीवरून सोमवारी त्याला ताब्यात घेतल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. मात्र त्या डाॅक्टरचे नाव समजू शकले नाही.

Trending