Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | ATS arrested 2 youth in Nalasopara blast case in jalgao

जळगावमधून पकडलेल्‍या त्‍या 2 तरूणांवर नालासोपारा स्‍फोटकेप्रकरणी आरोप, ATS आज कोर्टात करणार सादर

प्रतिनिधी | Update - Sep 09, 2018, 11:34 AM IST

साकळी येथून अटक करण्‍यात आलेल्‍या 2 तरूणांना आज (रविवारी) मंबई विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे.

  • ATS arrested 2 youth in Nalasopara blast case in jalgao

    यावल (जळगाव)- साकळी येथून अटक करण्‍यात आलेल्‍या 2 तरूणांना आज (रविवारी) मंबई विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. गुरूवारी (दि.6) व शुक्रवारी वासुदेव भगवान सूर्यवंशी व विजय उर्फ भैय्या उखर्डु लोधी या तरूणांना राज्‍याच्‍या एटीएसविरोधी पथकाने ताब्‍यात घेतले होते. दोन दिवस त्‍यांची चौकशी केल्‍यानंतर त्‍यांना नालासोपारा स्‍फोटकेप्रकरणी अटक करण्‍यात आल्‍याचे दहशतवादविरोधी पथकातर्फे सांगण्‍यात आले आहे.


    10 ऑगस्ट रोजी नालासोपारा येथे एटीएसने कारवाई करून 20 जिवंत बॉम्ब व बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करीत वैभव सुभाष राऊत यास अटक केली होती. तो सनातनचा साधक होता. त्यानंतर राज्यभरातील धाडसत्रात या प्रकरणी वैभव राऊतसह शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर व अविनाश पवार या 5 जणांना अटक करण्यात आली होती. त्‍यांच्‍याकडून मिळालेल्‍या माहितीनूसार, एटीएसने यावल तालुक्‍यातील साकळी गावातून वासुदेव भगवान सूर्यवंशी यास गुरूवारी (दि. 6) तर शुक्रवारी विजय उर्फ भैय्या उखर्डु लोधी यास ताब्यात घेतले होते.


    शनीवारी रात्री त्‍यांना अटक करण्‍यात आल्‍याचे एटीएसतर्फे सांगण्‍यात आले. त्‍यामुळे नालासोपारा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची संख्या आता सात झाली आहे. या आरोपींनी मुंबई, नालासोपारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर येथे घातपाती कारवाया, बॉम्बस्फोट, विशिष्ट विचारसणीचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींच्या हत्या घडवण्याचा कट आखल्याची माहिती पुढे आली आहे. नालासोपारा स्फोटकांप्रकरणी अटकेत असलेल्या वैभव राऊत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी इंटरनेटवरून बॉम्ब बनविण्याचे धडे घेतल्याचेही चौकशीतून समोर आले आहे.

Trending