आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Attack On 400 Buildings In Delhi Exposed, Fear Of Terrorist Attack In Bihar, Alert In 15 Districts

दिल्लीत ४०० इमारतींवर हल्ल्याचा कट उघड, बिहारमध्ये अतिरेकी हल्ल्याची भीती, १५ जिल्ह्यांत सतर्कतेचा इशारा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकच्या ताब्यातील काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने गोळीबार केल्यानंतर देशभरात जल्लोष साजरा केला. छायाचित्र अमृतसरचे आहे. - Divya Marathi
पाकच्या ताब्यातील काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने गोळीबार केल्यानंतर देशभरात जल्लोष साजरा केला. छायाचित्र अमृतसरचे आहे.

नवी दिल्ली-पाटणा  - दिल्लीत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहंमद ४०० हून जास्त इमारती व गर्दी असलेल्या बाजारपेठांना लक्ष्य करू शकते, असा दावा गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे. एका अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर दिल्ली पोलिसांनी मे २०१६ मध्ये तीन व यावर्षी जानेवारीत २ दहशतवाद्यांना अटक केली होती. हे दहशतवादी व त्यांना आश्रय देणाऱ्या १० जणांची चौकशी केल्यानंतर ही माहिती मिळाली. पोलिसांनी दिल्लीजवळील ८ भाग संवेदनशील म्हणून जाहीर केले . येथील ठाण्यांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. या भागांतील सुमारे ४२५ इमारती संवेदनशील आहेत. त्यापैकी २०० इमारती व्हीआयपी श्रेणीत मोडतात. या इमारतींची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. गुप्तचर विभागाला बिहारमध्ये दहशतवादी कारवाया होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर पोलिसांनी राज्याच्या १५ जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा दिला. दिवाळी व छट पूजेमुळे रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी असते. त्यामुळे अशा गर्दीच्या ठिकाणी सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले आहेत. 
 
 

भास्कर एक्सपर्ट सय्यद अता हसनैन, लेफ्टनंट जनरल (निवृत्त)

३७० रद्द झाल्याने पाकच्या छुप्या शक्ती थंडावल्या, तणाव वाढावा म्हणून कारस्थाने सुरू
 
पाकने सप्टेंबरपर्यंत २००० पासून जास्तवेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतरही काही लाभ व्हावा, अशी कोणतीही कृती काश्मीरमध्ये दिसून येत नाही. उलट पाकिस्तान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वातावरण अधिक तापलेले ठेवू इच्छिते. अशा स्थितीत भारताने प्रत्येक युद्धबंदीचे सडेतोड उत्तर द्यावे. 

एफएटीएफ : भारताच्या कारवाईचा एफएटीएफशी थेट संबंध नाही. काही देश पाकिस्तानला वेळोवेळी आर्थिक मदत करत राहतील. एफएटीएफने पाकिस्तानला काळ्या यादीत समाविष्ट करणे ही बाब पाकसाठी धोकायदायक ठरू शकली असती. परंतु, पाक किमान ग्रे यादीत तरी समाविष्ट झाला, हे भारताच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले. 
दहशतवादी नेटवर्क : भौगोलिक रणनीतीच्या दृष्टीने पाकिस्तान महत्त्वपूर्ण देश आहे, ही गाेष्ट आपण विसरता कामा नये. गेल्या एक वर्षात कारवाया तुलनेने कमी झाल्या. 

आता चीनविषयी : जम्मू-काश्मीरच्या परिसरात चीन महत्त्वाचा खेळाडू आहे. एलआेसीवर पाकच्या कारवायांना भारत सहन करणार नाही, हे चीनला ठाऊक आहे. काश्मीरच्या सुरक्षेसाठी आवश्यक सर्व गोष्टी भारत करेल, हे चीनला माहीत आहे. 

पीओकेवर चर्चा : संरक्षण मंत्री म्हणाले, पीआेकेवर भारताची भूमिका स्पष्ट आहे. त्याचा पाकिस्तानच्या मानसिकतेवर खोलवर परिणाम व्हायला हवा. लष्कराच्या बळावर पीआेके मिळवणे कठीण होईल. कारण गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये चीनचा हस्तक्षेप आहे. कोणतीही लष्करी कारवाई चीनसोबतच्या भारताच्या संबंधावर आणि अक्साई चीनच्या दृष्टीने परिणाम करणारी करू शकते. चीन भारतासोबत लष्करी पातळीवर गुंतू इच्छिणार नाही. 
 
 

अमेरिका : ट्रम्प यांनी ४ वेळा मध्यस्थीचा प्रस्ताव दिला
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ वेळा काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. पण भारताने प्रत्येक वेळी या प्रस्तावास नकार दिला आहे. यानंतर अमेरिकी संसदेच्या आशियाई प्रकरणांच्या समितीने म्हटले आहे की, काश्मीर हा भारत व पाकिस्तानचा द्विपक्षीय मुद्दा अाहे  तिसऱ्या देशाने यात बोलू नये, तर ही समिती लवकरच काश्मीरमधील मानवाधिकारांविषयी सुनावणी करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...