आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AAP च्या नेत्यावर जिवघेणा हल्ला, AAP-JDU कार्यकर्त्यांत हाणामारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीचम-नालंदा (बिहार)- आम आदमी पक्षाच्या दोन उमेदवारांवर रविवारी हल्ले झालेत. शाजिया इल्मी यांच्या मध्य प्रदेशातील सभेवर दगडफेक करण्यात आली तर बिहारमधील नालंदा येथे आपचे उमेदवार प्रणव प्रकाश यांना बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज (सोमवार) आपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी बिहारमधील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. नालंदा येथेही AAP-JDU कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांच्या नालंदा येथील आपचे उमेदवार प्रणव प्रकाश यांच्यावर काल रात्रीच्या सुमारास जिवघेणा हल्ला झाला. सुमारे 25 जणांनी रात्रीच्या सुमारास प्रकाश यांची कार थांबविली. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या कारचे काच फोडले. यावेळी कारवर गोळीबारही करण्यात आला, असे प्रकाश यांनी सांगितले आहे. या हल्ल्यामागे कोण आहेत, याचा तपास सुरू असून पोलिसांच्या हाती कोणत्याही स्वरुपात पुरावे सापडलेले नाहीत.
दुसरीकडे, मध्य प्रदेशातील मंदसौर मतदारसंघातील आपचे उमेदवार पारस सखलेचा यांचा प्रचार करण्यासाठी शाजिया इल्मी यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या मंचाच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका सुरू केल्याबरोबर दगडफेक सुरू झाली. त्यामुळे सभेत गोंधळ उडाला, असा दावा इल्मी यांनी केला आहे.
आम्ही हिंसेचे उत्तर प्रेमाने देऊ, म्हणाला शाजिया इल्मी... वाचा पुढील स्लाईडवर