आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे उमेदवार पराग शाह यांच्या गाडीची तोडफोड; पक्षाने मेहतांऐवजी शाहांना तिकीट दिल्याने मेहतांचे कार्यकर्ते नाराज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजपने आज सकाळी 7 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. भाजपने या यादीत घाटकोपर पूर्वमध्ये विद्यामान आमदार प्रकाश मेहतांना डावलून पराग शाह यांना तिकीट दिले. दरम्यान या तिकीट वाटपावरून मेहतांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांनी पराग शाह यांच्या घाटकोपर येथील घरासमोर गोंधळ घालत शाहांच्या गाडीची तोडफोड केली. दरम्यान प्रकाश मेहता यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. एकूणच घाटकोपरमध्ये भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे चित्र दिसत आहे.