आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापाऱ्यांवर लोखंडी रॉडने हल्ला; मारहाण करुन 90 हजार पळवले; प्रकृती गंभीर 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी रस्त्यावर गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमाराला दोन व्यापाऱ्यांना अडवून अज्ञात चोरट्यांनी जबर मारहाण केली. व्यापाऱ्यांकडील ९० हजारांची रक्कम लंपास करून चोरटे फरार झाले. या प्राणघातक हल्ल्यात दोन्ही व्यापारी गंभीर जखमी झाले. 

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर शहरातील उमर चौक परिसरात शंकर ट्रेडिंग कंपनीचे संचालक अविनाश शंकर संगनवार, अनिल शंकर संगनवार हे दोघे नित्याप्रमाणे दिवसभर व्यापार करून सिरंजनी गावाकडे रात्रीला ९.१५ वाजेच्या सुमाराला जात होते. दुकान बंद करून दुचाकीवरून निघालेल्या या युवा व्यापाऱ्यावर रात्री ९.३० वाजेच्या सुमारास सिरंजनी रस्त्यावरील एचपी गॅस गोदामासमोर अज्ञात हल्लेखोरांनी प्रथम गाडीसमोर कुत्रा सोडून दुचाकी अडवली. कुत्रा आल्यामुळे व्यापाऱ्यांनी ब्रेक मारला याच या वेळी अचानक बाजूला दबा धरून बसलेल्या दोन ते तीन अनोळखी चोरट्यांनी दोघांनाही लाकडी दांडके व लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच पाठीमागील व्यक्तीजवळ असलेली पैशांची थैली ज्यामध्ये जवळ्पास ९० हजार नगदी रक्कम घेऊन लंपास झाले. या घटनेमुळे जखमी होऊन बेशुद्ध झालेल्या व्यापारी युवकांना रस्त्याने पाठीमागून वाहनाने येणाऱ्या लोकांनी तत्काळ हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघां जखमींवर उपचार केले. अविनाश याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून १८ टाके पडले आहेत. तर अनिल यांच्या हातावर गंभीर वार झाल्याने डाव्या हाताचे हाड तुटले आहे. या दोन्ही गंभीर जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र बोरसे, जमादार बालाजी लक्षटवार, राजेश घुन्नर यांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. तसेच जबाब नोंदवून घेऊन तत्काळ घटनेतील आरोपींच्या शोधात पथक रवाना केले. 
 

बातम्या आणखी आहेत...