आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नांदेड- काँग्रेसचे आमदार व माजी शिक्षण राज्यमंत्री डी. पी. सावंत यांना तालुक्यातील तळणी येथे गावकऱ्यांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या स्वीय सहायकाला नागरिकांनी शनिवारी दुपारच्या सुमारास जबर मारहाण केली.
डी. पी. सावंत नांदेड तालुक्यातील लिंबगाव, धानोरा येथील पाणंद रस्ते आणि रस्त्याच्या भूमिपूजनानंतर तळणीचा पाणंद रस्ता, गावातील अंतर्गत रस्ते भूमिपूजन व युवक काँग्रेसच्या शाखेच्या फलकाच्या अनावरण कार्यक्रमासाठी गेले असता गावातील कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी त्यांनी दिलेल्या आश्वासनाबद्दल प्रश्न उपस्थित उपस्थित केले. केवळ निवडणुकीच्या तोंडावर येऊन मतांचे राजकारण करत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला. त्यावर सावंत यांचे स्वीय सहायक किरण तांदळे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कार्यकर्ते आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. सावंत यांच्यावर धावत जात नागरिकांनी धक्काबुक्कीचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वीय सहायक किरण तांदळे यांना मारहाण करण्यात आली. कार्यक्रमांचे उद्घाटन न करताच आमदार आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांना माघारी जावे लागले. याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आमदार डी. पी. सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळाला नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.