Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | Attack on girl in one sided love affair

अमरावतीत एकतर्फी प्रेमातून तरुणीवर प्राणघातक हल्ला; चाकूने गळा चिरून हत्येचा प्रयत्न

प्रतिनिधी | Update - Aug 28, 2018, 11:20 AM IST

एकतर्फी प्रेमातून अक्षय पुरूषोत्तम कडू या नातेवाईकानेच विद्यार्थीनीचा चाकूने गळा चिरून हत्या करण्याचा प्रयत्न केला.

  • Attack on girl in one sided love affair

    अमरावती- ट्यूशन वर्गातून मैत्रीणीसोबत घरी पायी जात असलेल्या शिवानी सुनील वासनकर (२०, रा. तारखेडा,) या विद्यार्थीनीचा एकतर्फी प्रेमातून अक्षय पुरूषोत्तम कडू (२२) या तिच्या नातेवाईकानेच चाकूने गळा चिरून हत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी खोलापुरी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर दुपारच्या सुमारास घडली. दरम्यान, या विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अक्षयला अटक करण्यात आली आहे.


    शिवानी भारतीय महाविद्यालयात बी. काॅम. दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. सोमवारी दुपारी ती मैत्रिणीसोबत ट्यूशननंतर घरी पायी जात होती. दरम्यान, अक्षयने (रा. शिरजगाव बंड ता. चांदूर बाजार) शिवानीला गाठले. त्याचा व शिवाणीचा वाद झाला. वाद वाढल्यामुळे अक्षयने चाकूने थेट शिवाणीच्या गळ्यावर वार केला. यात शिवाणीचा गळा कापल्या गेला. शिवाणीला तत्काळ इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Trending