आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शारीरिक सुखाच्या मागणीस कंटाळून समलैंगिकावर हल्ला; न्यायालयाच्या निर्णयानंतरची पहिलीच घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - सर्वोच्च न्यायालयाकडून समलैंगिक संबंधांना मान्यता मिळाल्यानंतर प्रथमच देशात समलैंगिकतेशी संबंधित गुन्ह्याची पुण्यात नोंद झाली आहे. समलैंगिक मित्राच्या शारीरिक सुखाच्या मागणीला त्रासून जोडीदारावर कोयत्याने वार केल्याची घटना खडकी भागात घडली. 


याप्रकरणी अनुराग कमलेश भाटिया नामक २३ वर्षीय समलैंगिक युवकास पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.  राकेश वर्तक असे ४६ वर्षीय जखमी समलैंगिक जोडीदाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश वर्तक उद्योजक असून पुण्यात त्यांचे वाहनांचे शोरूम आहे. २० वर्षांपूर्वी त्यांंचे रितसर लग्न झाले होते. मात्र, काही कारणास्तव त्यांचा पत्नीशी घटस्फोट झाला. या घटस्फोटानंतर ते अविवाहितच राहिले. सुमारे अडीच वर्षांपूर्वी त्यांची आरोपी अनुरागशी ओळख झाली. दोघेही समलैंगिक असल्याने ते बहुतांश वेळ सोबतच राहायचे. दरम्यान, राकेश नेहमीच अनुरागकडे शरीरसुखासाठी आग्रह धरायचे. त्यामुळे अनुराग त्रासून गेला होता. मंगळवारी रात्री दोघेही सोबत झोपले होते. बुधवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास अनुरागने राकेश यांचे डोके आणि खांद्यावर कोयत्याने वार करून जीव घेण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यात राकेश वर्तक यांच्या चेहऱ्याचे हाड मोडले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...