आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातेहरान : साैदी अरेबियाच्या जेद्दाह बंदरापासून जवळ शुक्रवारी इराणचे एक तेल जहाज सिनाेपामध्ये भयंकर स्फाेट झाल्याने आग लागली. हा हल्ला दाेन क्षेपणास्रांनी करण्यात आला. नॅशनल इरानियन आॅइल कंपनीच्या टँकरवर हा हल्ला झाला. तेव्हा, टँकर साैदी अरेबियाचे बंदर जेद्दाहपासून ९७ किमी अंतरावर हाेते.त्यामुळे हल्ल्यामागे सौदीचा हात असल्याचा आरोप करण्यात आला. टँकरवरील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. स्फाेटामुळे टँकरचे माेठे नुकसान झाले. टँकरमधील तेलाची लाल समुद्रात गळती हाेऊ लागल्याचे सूत्रांनी सांगितले. यंदा टँकरवर सातत्याने हल्ले केले जात असल्याचे पाहायला मिळाले. सर्वात आधी जुलै महिन्यात खाडीत इराणच्या टँकरवर ड्राेनने हल्ला झाला हाेता. तेव्हाही हल्ल्यामागे साैदी अरेबियाचा हात हाेता, असा आराेप झाला हाेता. त्यानंतर इराणने ब्रिटनच्या आॅइल टँकरला ताब्यात घेतले हाेते. गेल्या वर्षी इराणचे बंदर अब्बासवर साेडले हाेते.
साैदी अरेबियाच्या बंदरापासून ९७ किमी अंतरावरील घटना...
ब्रेंट क्रूड आॅइलच्या दरात २ टक्क्यांनी वाढ...
जहाजावरील हल्ल्याच्या बातमीमुळे कच्च्या तेलाच्या दरात २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तेल ६० डाॅलर प्रतिबॅरलवर पाेहाेचले आहे. डब्ल्यूटीआय कच्चे तेल २ टक्क्यांनी वाढून ५४ डाॅलर प्रतिबॅरल झाले. गेल्या काही महिन्यांपासून खाडीत तेल जहाजांवर हल्ले हाेत आहेत. त्यामुळे तणाव वाढू लागला आहे. या तणावातून कच्च्या तेल दरांत वाढ झाली आहे.
गेल्या महिन्यात दाेन तेल प्रकल्पांवर हल्ला...
गेल्या महिन्यात साैदीत जगातील सर्वात माेठ्या अरामकाेच्या दाेन तेल प्रकल्पांवर ड्राेनने हल्ला झाला हाेता. त्यानंतर जगभरात तेलाच्या दरांत जबरदस्त उसळी दिसून आली हाेती. साेबतच साैदी व इराण यांच्यातील संघर्षाचेही ते कारण ठरले. ड्राेन हल्ल्यांची जबाबदारी येमेनच्या हैती बंडखाेरांनी घेतली हाेती. अमेरिकेने इराणला जबाबदारी धरले हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.