आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिदवर गोळीबार; पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केली पिस्तूल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्लीत संसदेजवळ कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या बाहेर सोमवारी जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळीबार झाला. आपल्या दिशेनेच गोळी झाडण्यात आल्याचा दावा खालिदने केला. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल जप्त केली. गोळी झाडली की नाही, याची चौकशी केली जात आहे. 


खालिदनुसार, 'मी बाहेरून चहा घेऊन परतत असताना एका व्यक्तीने धक्का देऊन मला पाडले. माझ्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. जीव वाचवण्यासाठी मी पळालो. इतक्यात हल्लेखोराने तेथून पळ काढला. मी त्याचा चेहरा पाहिला नाही.' प्रत्यक्षदर्शींनुसार, खालिद गेटजवळ उभा असताना कुणीतरी दोन गोळ्या झाडल्या. दुसरीकडे, संयुक्त पोलिस आयुक्त अजय चौधरी म्हणाले, प्रत्यक्षात काय घडले याबाबत संभ्रम निर्माण आहे. गाेळी झाडली की नाही याचा तपास सुरू आहे. काॅन्स्टिट्यूशन क्लबबाहेर युनायटेड अगेन्स्ट हेट संघटनेने भयापासून मुक्तीवर चर्चेचे आयोजन केले होते. यादरम्यान ही घटना घडली. 

बातम्या आणखी आहेत...