आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिबी येथे पारधी समाजावर हल्ला; तितर लावऱ्या विकण्याच्या कारणावरुन दोन गटांत वाद,गुन्हा दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोणार- तितर लावऱ्या विकत घेण्याचे कारणावरुन पारधी समाजाच्या महिला व पुरुषांवर भ्याड हल्ला झाल्याची घटना २ जानेवारी रोजी रात्री बिबी येथे घडली. गवळी समाजाच्या व्यक्तींकडून हा हल्ला झाला. या हल्ल्या सातजण गंभीर जखमी झाले असून त्यांना जालना येथे उपचारार्थ हलविले आहे.विशेष म्हणजे हे भांडण पोलीस स्टेशन बीबी समोरच झाले आहे. या प्रकरणी जातीवाचक शिवीगाळ केल्यासह अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करणे चालू आहे.

 
या प्रकरणी नंदकिशाेर लिंबाजी भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हसन चौधरी अधिक बारा जणंाना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात नंदकिशोर भोसले, हसीना ताराचंद भोसले, छाया लठ्ठा भोसले, सरिता अरुण पवार, सुनील जयहरी भोसले, संगीता नंदकिशोर भोसले, ताराचंद जयहरी भाेसले आदी व्यक्ती जखमी झाले आहे. पुढील तपास सुरू आहे.