आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनाेरुग्ण काकाचा पुतण्यावर हल्ला; डोक्यात दगड घालून चाकूने भोसकले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - मनोरुग्ण चुलत्याला उपचारासाठी पाठवण्याबाबत चर्चा सुरू असताना चुलत्याने पुतण्याच्या डोक्यात दगड घालून त्याच्या पोटात चाकू खुपसल्याची घटना माजलगाव तालुक्यातील आनंदगावमध्ये घडली. जखमी पुतण्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रियाही केली आहे.



धारुर तालुक्यातील कारी येथील ज्ञानेश्वर महादेव मोरे (वय ३३)  हा आपले चुलते सुदाम गोपीनाथ मोरे (४६) यांच्यासोबत माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील मावशीकडे गेला होता. रविवारी तिथेच ते मुक्कामी थांबले होते. दरम्यान, सुदाम मोरे हे मनोरुग्ण असून त्यांना यापूर्वी येरवडा येथील मनोरुग्णालयात उपचारासाठी काही काळ ठेवले गेले होते. मात्र, सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठवले गेले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा ते विचित्र वागू लागले होते.  त्यामुळे चुलत्याला पुन्हा येरवडा रुग्णालयात पाठवण्याबाबतची चर्चा ज्ञानेश्वर हा आपल्या मावशीसोबत करत होता. ही चर्चा ऐकल्यानंतर बिथरलेल्या सुदाम यांनी ज्ञानेश्वरच्या डोक्यात दगड घालून त्याच्या पोटात चाकू खुपसला. या प्राणघातक हल्ल्यात ज्ञानेश्वर गंभीर जखमी झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. नातेवाइकांनी त्याला सुरुवातीला माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाेटात आतड्याला गंभीर इजा असल्याने त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलिसांत नोंद नव्हती.

बातम्या आणखी आहेत...