आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्‍यात गोमांस पकडण्‍यासाठी गेलेल्‍या पोलिसांवर जीवघेणा हल्‍ला, अंगावर घातली गाडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पिंपरी चिंचवड शहरातील दिघी परिसरात गोमांस विक्रेत्‍यांवर कारवाई करण्‍यासाठी गेलेल्‍या पोलिसांवर विक्रेत्‍यांनी जीवघेणा हल्‍ला केला. यादरम्‍यान आरोपींनी पोलिसांच्‍या थेट अंगावर गाडी घातली व त्‍यांना जीवे मारण्‍याचा प्रयत्‍न केला. गुरूवारी सकाळी 11 वाजेच्‍या सुमारास ही घटना घडली. या हल्‍ल्‍यात एक पोलिस आधिकारी गंभीररीत्‍या जखमी झाला आहे. हल्‍ल्‍यानंतर अज्ञात हल्‍लेखोर गाडी सोडून फरार झाले आहेत.  


अशी घडली घटना
पोलिसांना दिघी परिसरात गोमांस विक्री सुरू असल्‍याची माहिती मिळाली होती. त्‍यानूसार पोलिस कारवाईसाठी गेले असता त्‍यांना मॅगझिन चौक येथे दोन स्‍कॉर्पियो संशयास्‍पदरीत्‍या आढळून आल्‍या. पोलिसांना पाहताच आरोपींनी स्‍कॉर्पिओमधून पळ काढण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यांना थांबवण्‍यासाठी पोलिस गाडीसमोर येताच आरोपींनी थेट त्‍यांच्‍या अंगावर गाडी घातली. यामध्‍ये एक पोलिस अधिकारी गंभीररीत्‍या जखमी झाला. नंतर गाडीतून उतरून आरोपींनी पोलिसांना मारहाण केली व स्‍कॉर्पिओ तेथेच सोडून ते फरार झाले. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्‍यामध्‍ये भरपूर प्रमाणात गोमांस आढळून आले. हे गोमांस पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. सध्‍या दिघी परिसरात नाकेबंदी करण्‍यात आली असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, अधिक फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...