आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीस्वारावर हल्ला करून गाडी पळवून नेली, डीक्कीत होते 5 लाख रुपये, काही सेकंदातच घडली घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोगा - पंजाबच्या मोगा जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी एका मनी एक्सचेंजर कंपनीच्या कर्मचाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून गुंडांनी स्कुटी पळवून नेली. या स्कुटीच्या डीक्कीमध्ये पाच लाख रुपये ठेवलेले होते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 


बाघापुराना येथील सुरेश कुमार सेतिया यांचे मुदकी रोडवर सेतिया मनी एक्सचेंजर हे शॉप आहे. सोमवारी सायंकाळी त्यांचा एक कर्मचारी गुरुप्रकाश दुकानापासून काही अंतरावर असलेल्या अॅक्सिस बँकेतून 9 लाख रुपये काढून आणत होता. त्यावेळी कर्मचाऱ्याने खिशात 4 लाख तर उरलेले पाच लाख स्कुटीच्या डीक्कीत ठेवले होते. गौशालाच्या जवळ आधीच उभ्या असलेल्या गुंडांनी स्कुटीवर धारदार शस्त्राने वार केला. त्या हल्ल्यात गुरुप्रकाश बालंबाल बचावला.  तो स्कुटी मागे वळवू लागला. पण त्याचा तोल गेला आणि तो रस्त्यावर जाऊन पडला. त्यानंतर गुंड स्कुटी घेऊन फरार झाला. एसएचओ जसंवत सिंह यांनी सांगितले की गुंडांचा शोध सुरू आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...