कोल्‍हापूरात खंडणीसाठी 'जुळता / कोल्‍हापूरात खंडणीसाठी 'जुळता जुळता जुळेना' मालिकेच्‍या सेटवर हल्‍ला, दिग्‍दर्शकाला धक्‍काबुक्‍की

Aug 07,2018 03:03:00 PM IST

कोल्‍हापूर - खंडणीसाठी 'जुळता जुळता जुळेना' या आगामी मालिकेच्‍या सेटवर काल (सोमवारी) रात्री हल्‍ला करण्‍यात आला. करवीर तालुक्‍यातील केर्ली या गावात ही घटना घडली. याप्रकरणी केर्ली गावचा उपसरपंच अमित पाटील याच्‍यासह इतर 9 जणांवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असून पोलिसांनी त्‍यांना अटक केली आहे.

केर्ली गावात शुटिंग करायचे असेल तर प्रोटेक्‍शनसाठी आम्‍हाला पैसे द्यावे लागतील, असे उपसरपंच अमित पाटील व त्‍याच्‍या साथीदारांनी दिग्‍दर्शकाला धमकावले होते. मात्र पैसे देण्‍यास दिग्‍दर्शकाने नकार दिल्‍याने काल चित्रीकरणासाठी आलेल्‍या वाहनांची आणि शुटिंगच्‍या साहित्‍याची अमित पाटील व त्‍याच्‍या साथीदारांनी तोडफोड केली. यावेळी मालिकेचे दिग्‍दर्शक गौतम कोळी यांना धक्‍काबुक्‍कीदेखील करण्‍यात आली.

याप्रकरणी अमित पाटील, दगडू कांबळे, किरण कांबळे, चंद्रकांत कोपार्डे, अक्षय पाटील, अवधूत पाटील, अमित मोहिते, कपिल पाटील, रवींद्र पाडेकर या सर्वांना करवीर पोलिसांनी अटक केली आहे. या मालिकेची निर्मिती सोबो फिल्‍म प्रायव्‍हेट लिमिटेड मुंबई प्रोडक्‍शनतर्फे केली जात आहे.


पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो....

X