आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Attack On Students At JNU, Deepika's Entry Into Campus; Bollywood Divided Into Three Parts

जेएनयूमधील विद्यार्थ्यांवरील हल्ला, दीपिका पदुकोणचा कॅम्पसमध्ये प्रवेश; तीन भागात विभागले गेले बॉलिवूड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः फी वाढ, नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि कॅम्पसमध्ये झालेली हिंसा अशा अनेक घटनांमुळे जवाहरलाल विद्यापीठ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनाच्या वेळी जेएनयू कॅम्पसमध्ये दीपिका पदुकोणच्या एन्ट्रीने बॉलिवूडला तीन भागात विभागले आहे. काही सेलेब्स दीपिकाने उचललेल्या पावलाचे समर्थन करत आहेत तर काहीजण केवळ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने असे केले, म्हणून तिच्यावर टीका करत आहेत. तर काही सुपरस्टार्स यावर मौन बाळगून आहेत. 


सोशल मीडियावर चालली 'छपाक' चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मोहीम

  • हे सेलिब्रिटी करत आहेत निषेध

अशोक पंडित: भारतात हजारो संस्था आहेत, पण जेएनयूमध्येच विद्यार्थी मुखवटा घालून दहशत का पसरवतात? ते म्हणाले की, हे पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या दहशतवादी कॅम्पसारखे आहे, जे भारतात दहशत पसरवण्यासाठी दहशतवाद्यांना तयार करते. ते म्हणाले की, ज्यांनी मालमत्तेचे नुकसान केले अशांना तुम्ही पाठिंबा देणार का, भारताचे तुकडे होतील, अशा घोषणांचे तुम्ही समर्थन कराल का?

रंगोली चंदेल: अ‍ॅसिड अटॅक सर्व्हायव्हर रंगोली चंदेलने दीपिकाच्या जेएनयू भेटीला पब्लिसिटी स्टंट म्हटले आहे. ती म्हणाली की, आपण तिचा आदर केला पाहिजे कारण तिने फक्त पीआर केले आहे. दीपिका याआधीही बर्‍याच मुद्द्यांवर बोलली आहे. तिला विद्यार्थ्यांमध्ये रस आहे, असे मला वाटत नाही. तिला फक्त पैसे मिळविण्यात रस आहे.

विवेक रंजन अग्निहोत्री: टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, अभिनेत्री तिथे गेली आहे आणि तिने उर्वरित 98 टक्के विद्यार्थ्यांना सांगितले की ती त्यांच्या पाठीशी उभी नाही. फिल्म सेलिब्रिटींना पाकिस्तानकडून मदत मिळत आहे.

अनुपम खेर: जेएनयू हिंसाचाराला जबाबदार असलेल्या गुंडांना अटक करा. विद्यापीठात रक्तपात होऊ नये. त्या लोकांची खरी ओळख उलगडा आणि कुणावरही कॅमेरा दाखवून त्यांना दोष देणे टाळा. चळवळ ठीक आहे, परंतु देशाच्या संपत्तीचे नुकसान करणारे देशद्रोही आहेत.

जूही चावला: काहीही तोडण्यास वेळ लागत नाही, परंतु ते तयार होण्यासाठी लागतो. निषेधाच्या वेळी देशभरात ब-याच बसेस आणि राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान झाले.

दिलीप ताहिल: गृहमंत्र्यांच्या तोंडून सीएएचा विषय निघावा आणि त्याला निषेध व्हावा,  हे सर्व जामिया, एमयूसारख्या विद्यापीठांमध्ये आधीच ठरवले गेले होते. 

  • या सेलिब्रिटींनी समर्थन व्यक्त केले

अनुराग कश्यप: स्त्री प्रजाती मजबूत आहे, होती आणि राहिल. 'छपाक'चे पहिल्या दिवशीचे सर्व शो. हिंसेच्या विरोधात उभे असलेले सर्वजण बुक माय शो वर जा आणि आमच्या मौनचा परिचय द्या. 

स्वरा भास्कर: विद्यापीठामध्ये सध्या सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत स्वरा भास्करने सोशल मीडियावर याचिका मोहीम सुरू केली आहे. याचिकेत विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची आणि पोलिसांच्या मनोवृत्तीची चौकशी करण्याची मागणी तिने केली आहे. दीपिका पदुकोणच्या जेएनयू कॅम्पस भेटीची तिने प्रशंसा केली.

अनुभव सिन्हा: लक्षात ठेवा, ही गोष्ट कोणत्या घरातून आली आहे? प्रकाश पदुकोणची ती मुलगी आहे. ती व्यक्ती हीरो आहे. वर्षानुवर्षे त्या व्यक्तीने देशाची मान उंचावली आहे.
 

प्रकाश राज: धन्यवाद दीपिका पादुकोण. खरी भारतीय झाल्याबद्दल धन्यवाद.

कोंकणा सेन शर्मा: ब-याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेल्या कोंकणा सेन शर्माने दीपिका पदुकोणने घेतलेल्या निर्णयाचे वर्णन केले. तिने दीपिकाचा विद्यार्थ्यांसोबतचा फोटो शेअर केला आणि त्याला 'सन्मान' असे कॅप्शन लिहिले.

निखिल आडवाणी: आज निर्माता म्हणून दीपिका पदुकोणने मुंबईतील चित्रपटगृहांच्या बाहेर उभे राहून आपल्या प्रॉडक्शनच्या पहिल्या चित्रपटाचे होत असलेल्या कौतुकाची वाट बघायला हवी होती. त्याऐवजी ती जेएनयू विद्यार्थ्यांच्या पाठिशी ठामपणे उभी राहिली. तेदेखील दुष्परिणाम ठाऊक असताना. तुझा मी आदर करतो. 

मोठे स्टार्स राहिले गप्प 
अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, अक्षय कुमार, हृतिक रोशन, अनुष्का शर्मा, करीना कपूर या बड्या स्टार्सनी या प्रकरणात प्रतिक्रिया दिली नाही.

विद्या बालन म्हणाली होती की, लोक प्रत्येक विषयावर कलाकारांनी बोललेच पाहिजे अशी अपेक्षा का करतात. जर आमच्याकडे एखाद्या विषयावर कमी माहिती असेल तर आम्ही निर्णय घेतला आहे की आम्ही त्याबद्दल कमी बोलू, तर मग काय अडचण आहे. तिने म्हणाली की,  मी सेटवर काम करते, 200 लोक माझ्याबरोबर काम करतात. आता जर माझ्या एखाद्या विधानाचा त्या सर्वांवर परिणाम झाला तर मी स्वतःला दोषी मानेन.

सैफ अली खान यानेदेखील अशा राजकीय विषयांवर तो आपले मत का देत नाही हे स्पष्ट केले. सैफ म्हणाला की, मी अजूनही राजकीय कामांवर दृढ दृष्टिकोन बाळगण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणूनच आत्ताच याविषयी मत  देणे मला गरजेचे वाटत नाही. भारतातील राजकीय मुद्द्यांवर आपण बोलतो एक आणि ते वेगळ्याच पद्धतीने समजून घेतले जाते.