आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवल्याने मारहाण केल्याचे प्रकरणी पोलिसांविरोधात मानवी हक्क आयोगाकडे तक्रार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेलापूर- पंतप्रधानांच्या दाैऱ्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले हाेते. मात्र पाेलिसांनी सुरक्षेचे कारण देत त्यांच्यावर लाठीमार केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अॅड. असीम सराेदे यांनी साेलापूर पाेलिसांविराेधात राष्ट्रीय मानवी हक्क आयाेगाकडे तक्रार दाखल केली आहे.

 

बुधवारी माेदींच्या गाड्यांचा ताफा सभेच्या ठिकाणी जात असताना ४ ते ५ जणांनी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. मात्र साध्या वेशातील पोलिसांनी त्यांना शिव्या देत लाथाबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केली. यात मानवी हक्काचे उल्लंघन झाले असून त्यांना नुकसान भरपाईही देण्यात यावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. सोलापूरचे आयुक्त व ग्रामीणचे पाेलिस अधीक्षक यांच्याविराेधातही तक्रार केली आहे. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह इतर नेत्यांनीही पाेलिसांच्या या दडपशाहीचा निषेध केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...