आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत ट्राफिक कॉन्‍स्‍टेबलला तरूणाची मारहाण, ट्रिपल सीट जाताना अडवल्‍याने आला राग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उल्‍हासनगरमध्‍ये ट्रिपल सिट जाणा-या तरूणांना अडवल्‍याने तिघांनी कॉन्‍स्‍टेबलला मारहाण केल्‍याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओही व्‍हायरल झाला आहे. याप्रकरणी आरोपी तरूणांवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.


नेमकी काय आहे घटना
मंगळवारी दुपारी 2.30 वाजेच्‍या सुमारास ही घटना घडली. कॉन्‍स्‍टेबल रावसाहेब काटकर उल्‍हासनगर येथे ड्युटीवर तैनात होते. यादरम्‍यान त्‍यांनी बाईकवर भरधाव वेगाने ट्रिपल सिट जाणा-या युवकांना रोखण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र युवकांनी बाईक थांबविली नाही. उलट तिची स्‍पीड वाढवून ते तेथून फरार झाले. यानंतर रावसाहेब यांनी आपल्‍या बाईकद्वारे त्‍यांचा पाठलाग करून त्‍यांना पकडले. याचा बाईक चालवणा-या संभाजी मुंडे (32) या तरूणाला राग आला व त्‍याने कॉन्‍स्‍टेबल काटकर यांची कॉलर पकडून त्‍यांना मारहाण केली.

 

अटकेसाठी बनवले पथक
या घटनेनंतर आरोपी अप्‍पा संभाजी मुंडे यांच्‍या विरोधात विठ्ठलवाडी पोलिस ठाण्‍यामध्‍ये आयपीसी 353 ,332 , 504 , 506 अंतर्गत गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. आरोपी युवकाला अटक करण्‍यासाठी मुंबई पोलिसांनी दोन पथकही बनविले होते.   

 

बातम्या आणखी आहेत...