आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचारावरून दोन जणांवर तलवारीने जीवघेणा हल्ला, देवळालीत तणाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाळा- देवळाली (ता. करमाळा) येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रचार करण्याच्या कारणावरून बागल गटाच्या दोन जणांना तलवारीने जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आपणास मारहाण करून जखमी केल्याची व गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतल्याची तक्रार पाटील गटाकडून करण्यात आली असल्याने नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा परस्पर विरोधी फिर्याद करमाळा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास घडली आहे. 


याबाबत करमाळा पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी
शुक्रवारी सकाळी पावणे आठ वाजता अशोक गायकवाड व दिलीप गायकवाड हे देवळाली येथील शंभूराजे हॉटेल येथे चहा पित बसले होते. या वेळी संदीप गुंड व इतर साथीदार तिथे येऊन म्हणाले, तुमच्या घरातील सात जणांना तडीपार केले आहे. तरी तुमची जिरली नाही का? मतदानाचा प्रचार का करता? अशी विचारणा करून मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी संदीप, लखन, राहुल यांनी गज, टाॅमी व तलवारीने अशोक गायकवाड यांच्या पाठीत कपाळावर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात अशोक गायकवाड यांच्या कपाळावर तलवार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. दिलीप गायकवाड यांना इतर संशयितांनी काठीने व दगडाने मारहाण केल्यामुळे ते जखमी झाले. सोडवण्यासाठी आलेल्या बाळू साळवे व अण्णासाहेब गुंड यांनाही मारेकऱ्यांनी जीव मारण्याची धमकी देऊन गप्प राहण्यास सांगितले. मारेकरी निघून गेल्यानंतर अशोक गायकवाड व दिलीप गायकवाड यांना करमाळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांनाही सोलापूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक राजेश देवरे करीत आहेत. 


नऊ सप्टेंबरला करमाळा बाजार समितीची बागल आणि पाटील गटात चुरशीने निवडणूक होत अाहे, या निवडणुकीच्या प्रचारावरून दोन गटांत बाचाबाची झाल्याने करमाळा पोलिसांसमोर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान आहे. 


बागल गटातील : अशोक गायकवाड व दिलीप गायकवाड, दोघे रा. देवळाली हे दोघे तलवार हल्ल्यात जखमी झाले आहेत. उपचारासाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी कैलास कानगुडे (वय ३७, रा. देवळाली) यांनी फिर्याद दिली आहे. संदीप गुंड, लखन शिंदे, राहुल कानगुडे, सचिन कानगुडे, लक्ष्मण ननवरे, सुधीर आवटे, संजय गोसावी, लखन शिंदे, पप्पू शिंदे, नागेश ढेरे, बाळासाहेब शिंदे, आश्रू आवटे, हनुमंत ननवरे, गहिनीनाथ कानगुडे, सर्व रा. देवळाली, ता. करमाळा असे गुन्हे दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. 

बातम्या आणखी आहेत...