आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोक्यात मारला लाेखंडी रॉड, रिक्षाचालक जखमी; बंदचे आवाहन करताना टवाळखाेरांची दादागिरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- रेल्वेस्थानक परिसरात काही रिक्षाचालकांनी मंगळवारी संपाचे आवाहन केले होते. सकाळी ९ वाजता स्टॉपवर रिक्षा उभ्या केल्याने चौघांनी शिवीगाळ करीत तीन रिक्षांची तोडफोड केली. या वेळी एका मद्यपी रिक्षाचालकाने दुसऱ्याचे डोके फोडले. याप्रकरणी शहर पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

 

विविध मागण्यांसाठी मंगळवारी शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील काही रिक्षाचालकांनी बंदचे आवाहन केले होते. दुपारी पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार होते. बंदच्या आवाहनानंतरही काही रिक्षाचालक रेल्वेस्थानक परिसरात आले होते. सकाळी ९ वाजता सुमारास मोन्या, पप्पू खंडेलवाल, विक्की सोमनाथ बाविस्कर, अजय पांचाल यांनी बंदचे आवाहन केले. या वेळी काही रिक्षाचालकांनी रांगेत रिक्षा उभ्या केल्या होत्या. याचा राग आल्यामुळे चौघांनी हातात लाठ्या-काठ्या घेऊन थेट रिक्षांची तोडफोड सुरू केली. चौघांनी रांगेत लावलेली राहुल भिकाजी जोशी (रा.खोटेनगर) यांची रिक्षा क्रमांक एमएच.१९ .जे. ८८२१, रिक्षा क्रमांक एमएच. १९ .व्ही. ८२२१ यांच्यासह इतर दोन रिक्षांच्या काचा फोडल्या. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. वादानंतर रेल्वेस्थानकावर तणावाचे वातावरण निर्माण झाला होता. 

 

अदखलपात्र गुन्हा 
विक्की बाविस्कर याने जावेद शरीफ बागवान (वय ३१, रा.पोलिस कॉलनी, सुप्रीम कॉलनी) याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. यात जावेद जखमी झाला होता. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आले. जावेदने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...