आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन - इंग्लंडच्या मँचेस्टर शहरामध्ये सोमवारी रात्री एका संशयित दहशतवाद्याने रेल्वे स्टेशनमध्ये गर्दीवर अचानक हल्लाबोल केला. पोलिसांच्या मते, या हल्ल्यात एका पोलिसासह तीन जण जखमी झाले आहेत. बीबीसी रेडिओचे प्रोड्युसर सॅम क्लैक हल्ल्याच्या वेळी घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, संशयित लोकांवर हल्ला करण्यापूर्वी ‘अल्लाह’असे ओरडला होता.
सॅम यांच्या मते, हल्लेखोराने म्हटले होते की, जोपर्यंत तुम्ही इतर देशांवर बॉम्ब हल्ले करत राहाल तोपर्यंत या घटना घडतच राहतील. पोलिसांनी घटनेनंतर मिरचीचा स्प्रे आणि स्टन गनच्या मदतीने हल्लेखोरावर नियंत्रण मिळवले. सध्या त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. जखमींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
टोकियो स्ट्रीटमध्ये गर्दीत घुसली वेगवान कार, 9 जखमी
जपानमधील प्रसिद्ध टोकियो स्ट्रीटमध्ये नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला जल्लोष सुरू असताना एका व्यक्तीने हल्ला करण्याच्या इराद्याने वेगवान कार गर्दीत घुसवली. या अपघातात 9 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एक जण गंभीर आहे. पोलिसांनी 21 वर्षांच्या काजुहिरो कुसाकाबेसला घटनास्थळाहून अटक केली आहे. हा हल्ला प्रशासनाविरोधातील रागातून केला असल्याचे म्हटले जात आहे.
थायलंडमध्ये तरुणाने कुटुंबातील 6 जणांवर गोळी झाडली
नव्या वर्षाच्या निमित्ताने थायलंडच्या चुम्फोन प्रांतात एका तरुणाने नव्या वर्षाच्या पार्टी दरम्यान कुटुंबातील 6 जणांची गोळी मारून हत्या केली. पोलिसांच्या मते, मृतांमध्ये त्याचा 9 वर्षांचा मुलगा आणि 6 वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. सुचीप सोर्नसंग असे तरुणाचे नाव आहे. पोलिसांच्या मते, पत्नीच्या कुटुंबीयांकडून स्वागत झाले नाही म्हणून सुचीपला अपमान झाल्याची भावना निर्माण झाली होती. त्याच रागातून त्याने पायरिंग केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.