आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतवस्तीवर दरोडा; शेतकऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 वैजापूर- शेतवस्तीवरील घराचा दरवाजा दगडाने तोडून दरोडेखोरांच्या टोळीने शेतकऱ्याच्या कुटुंबाला मारझोड करत प्रतिकार करणाऱ्या शेतकऱ्याला चाकूने भोसकून जखमी करत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह  नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल लुटून नेला.   गोरख त्रिंबक तनपुरे असे दरोडेखोराच्या हल्ल्यात  जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. विरगाव पोलिस ठाण्यापासून तीन कि.मी. वरील  नादी गावालगत  कापूसवाडगाव रोडवर शेतवस्तीवर  राहणारे  गोरख त्रंबक तनपुरे (४९) यांच्या घरी हे नेहमीप्रमाणे रात्री झोपले असता मध्यरात्री अडीच वाजेच्या दरम्यान चार दरोडेखोरांनी घराचे दार दगडाने तोडून प्रवेश केला. आवाज आल्याने गोरख जागी झाले. त्यांनी  दरोखोरांचा प्रतिकार केला. या झटापटीत  चोरांनी गोरख  यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूच्या गालावर व शरीरावर चाकूने वार करून घरातील रोख रक्कम पंचेचाळीस हजार व सोने- चांदीचे दागिन्याची चोरी करून फरार झाले. अंदाजे ऐंशी ते नव्वद हजार रुपयांच्या ऐवजासह चोरी करून चोरटे पसार झाले.
बातम्या आणखी आहेत...