आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकानातून सामान आणून देण्याच्या बाहण्याने घरात बोलावले; अल्पवयीन युवतीवर अत्याचाराचा प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारणी- पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावात एका ४० वर्षीय परिचित व्यक्तीने १६ वर्षीय युवतीचे अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची बाब शुक्रवारी समोर आली आहे. १५ सप्टेंबर रोजी अल्पवयीन युवती शाळेतून परत येत असताना परिचित व्यक्तीने तिला किरणा दुकानातून सामान आणून देण्याच्या बाहण्याने घरात बोलावले. 


दरम्यान तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करीत असतानाच युवतीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आरोपीची पत्नी धाऊन आली. पत्नी येत असल्याचे पाहून आरोपीने युवतीला तसेच सोडून घरातून पळ काढला. दरम्यान, घाबरलेल्या पीडीतेने कुटुंबियांच्या मदतीने धारणी पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...