आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर जिल्ह्यात घर पेटवून सख्ख्या भावाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे - किरकोळ कारणावरून शरद मारुती भदे याने आपला सख्खा भाऊ गोरख याला बुधवारी पहाटे घरात कोंडले. नंतर घराला आग लावून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर गुप्तीने वारही केले. ही घटना शेडगाव येथे घडली. याप्रकरणी शरद मारुती भदे व त्याची पत्नी रुपालीवर श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.]

शरद व गोरख भदे हे सख्खे भाऊ शेजारीशेजारीच भदेवस्तीवर राहतात. काही दिवसांपासून त्यांच्यात शेतीचा वाद सुरू होता. विहिरीवरील मोटारीचा विजेचा आकडा काढण्यावरून सोमवारी भावांमध्ये भांडण झाले होते. याप्रकरणी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. आपल्या विरोधात तक्रार दिल्याचा राग आल्याने शरदने बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास गोरखच्या छपराच्या घराचा दरवाजा बाहेरून बंद करून कडी लावून घराला आग लावून दिली. काही वेळातच आग पसरली. झोपेत असलेले गोरख व त्याची पत्नी सुरेखाने दरवाजा तोडून बाहेर येण्यासाठी आरडाओरडा केला. बाहेरून कडी लावली असल्याने दरवाजा लवकर तोडता आला नाही. दरवाजा जळाल्यावर त्यांना बाहेर पडता आले. बाहेर शरद  हातात गुप्ती घेऊन उभा होता. गोरख बाहेर येताच शरदने त्याच्या पाठीवर व पोटावर वार केले. गोरखची पत्नी सुरेखाही मोठ्या प्रमाणात भाजली. दोघेही बराच वेळ जमिनीवर पडून होते. त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारीपाजारी तेथे आले. त्यांनी श्रीगोंदे पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत नागरिकांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. गोरखची प्रकृती चिंताजनक आहे.

बातम्या आणखी आहेत...