आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या पश्चातही मराठ्यांची ही विजयी घौडदौड सुरूच होती. त्यातून 28 एप्रिल 1757 रोजी रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्वात थोरले तुकोजी होळकर आणि साबाजी शिंदे यांनी अत्यंत खडतर प्रवास करून आताच्या पाकिस्तानात असलेला अटकेला किल्ला जिंकला. त्यातून 'अटकेपार झेंडे' ही मन प्रचलित झाली. त्याची खास माहिती divyamarathi.com च्या वाचकांसाठी...
नेमके कुठे आहे अटक ?
हे शहर पाकव्याप्त पंजाब प्रांतांतील तालुक्याचे ठिकाण आहे. येथे नॉर्थ वेस्टर्न रेल्वचे स्टेशन असून, येथील सिंधूनदीच्या काठावर अटकचा किल्ला आहे. पूर्वीच्या काळी ही नदी पार करून किल्ल्यावर पोहोचणे अत्यंत अवघड होते. परंतु, मराठ्यांनी हा किल्ला जिंकला.
मोगलांचे रक्षण करण्यासाठी गेले होते मराठे तत्कालीन मोगलांच्या साम्राज्यावर अब्दालीने आक्रमण केले. अशा प्रसंगी मराठ्यांनी मोगलांचे सहकार्य करावे आणि त्यांच्या बाजूने लढावे असा करार मराठे आणि मोगलांमध्ये झालेला होता. त्या आधारे मराठ्यांचे पंतप्रधान रघुनाथराव पेशव्यांच्या पुढाकाराखाली उत्तरेची मोहीम आखली. यातच मराठ्यांनी आताच्या पाकिस्तानातील अटकेचा किल्ला जिंकला.
आता किल्ल्यावर काय आहे?
या किल्ल्याचा पाहण्यासाठी आताही रोज हजारो पर्यटक येतात. येथे शिबंदी तोफखाना आहे. किल्याच्या समोरच कमालिया व जलालिया नावाच्या काळ्या दगडांच्या कड्यांमध्यें सिंधू नदीच्या पात्रांत भोवरे आहेत. नदीच्या वरच्या बाजूस, अटकपासून 16 मैलांवर, ओहिंद येथे होड्यांचा पूल करून अलेक्झांडर नदीपार आला असे म्हणतात.
हा किल्ला कुणी बांधला ?
अकबराने आपला भाऊ हकीम मिरझा याच्या स्वार्यांपासून बचाव करण्याकरिता हा किल्ला पुन्हा बांधला. त्याचे नाव अटक-बनारस असे ठेवले. 1812 तरणजितसिंहाने या किल्ल्यावर हल्ला केला होता. पहिल्या शीख युद्धांत इंग्रजांनी हा किल्ला घेतला होता. परंतु, दुसर्या युद्धांत तो त्यांना कायम ठेवता आला नाही. ते युद्ध संपल्यावर नंतर शीख लोकांकडून तो किल्ला फिरून इंग्रजांच्या ताब्यात आला. 1873 मध्ये सिंधुनदीवर असलेला रेल्वेपूल व दुसरा रस्ता तयार झाला.
किल्ल्याचे नाव अटकच का ?
या किल्ल्याच्या जवळ असलेली नदी उतरून किल्ल्या जाणे पूर्वी महाकठीण होते. जवळजवळ ते अशक्यच होते. तसे करण्याचा कुणी प्रयत्न केला तर किल्ल्यावरील सैनिकांना ते तत्काळ दिसत आणि ते त्यांना तत्काळ अटक करत. म्हणून त्याला अटक हे नाव दिले असावे, असेही म्हटले जाते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, किल्याचे काही फोटोज....
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.