आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बी आणि थलाइवा इफ्फीचे आकर्षण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नितीश गोवंडे

पणजी - यावर्षीच्या सुवर्णमहोत्सवी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला दोन सुपरस्टार्स हजेरी लावून महोत्सवाची रंगत वाढवणार आहेत. बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि तामिळ फिल्म इंडस्ट्रीचे मेगास्टार थलाइवा अर्थात रजनीकांत या दोन महानायकांच्या उपस्थितीने यंदाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यादगार होणार आहे.अमिताभ बच्चन उद्घाटक व दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत यांच्यासारख्या सिने जगताच्या महानायकांच्या उपस्थितीमुळे यंदाचा इफ्फी नक्कीच सुवर्णमयी ठरणार आहे. या वेळी रजनीकांत यांना ‘आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबिली’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय सिनेमा जगतात मोलाचे योगदान दिल्याबद्दल या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. सुपरस्टार रजनीकांत चार दशकांहून अधिक काळ जगभरातील लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. बॉलीवूड ते दक्षिणेतील चित्रपटसृष्टीपर्यंत शानदार प्रवास करणाऱ्या सुपरस्टार रजनीकांत यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात १९७५ मध्ये ‘अपूर्व रागंगल’ या तामिळ चित्रपटापासून केली. रजनीकांत यांनी विविध भाषांमधल्या १७० चित्रपटांमध्ये काम केले आहे. रजनीकांत यांना २००० मध्ये पद्मभूषण आणि २०१६ मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. २०१४ मध्ये ४५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रजनीकांत यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय व्यक्ती म्हणून भारतीय चित्रपट शतकवर्षपूर्ती पुरस्कार देण्यात आला होता.बातम्या आणखी आहेत...