आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्कः झी मराठी प्रेक्षकांसाठी एक असा चॅट शो सादर करणार आहे ज्यात कलाकार त्यांच्या मुलांसोबत सज्ज होतील. या कार्यक्रमाचं नाव आहे ‘अळीमिळी गुपचिळी’. लहानांची मोठ्यांना कोपरखळी असलेला हा धमाल शो 'अळीमिळी गुपचिळी' १७ जानेवारी पासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहेत अभिनेता अतुल परचुरे. या निमित्ताने त्यांच्यासोबत साधलेला हा खास संवाद
अळीमिळी गुपचिळी हा एक मजेदार कार्यक्रम आहे. प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांचा सार्थ अभिमान असतोच पण कुठल्या क्षणी त्याच्या भोळेपणाने आपली विकेट घेईल हे ही सांगता येत नाही. मुलं जे मनात येईल ते बोलतात, आत एक बाहेर एक असं काही नसतं त्यामुळे बाहेरच्या लोकांसमोर किंवा पाहुण्यांसमोर ते कधी काय बोलून जातील याचा नेम नसतो. सेलिब्रिटीज हे जगासाठी जरी सेलिब्रिटी असले तरी त्यांच्या मुलांसाठी ते आई-वडीलच असतात. त्यामुळे ते त्यांची कशी विकेट घेतील हे या कार्यक्रमात पाहायला मिळेल.
मी पहिल्यांदाच या दोघांसोबत काम करतोय. आमची चांगली गट्टी जमली आहे त्यामुळे आमची खूप जुनी ओळख आहे की काय असं वाटतय. पहिल्यांदा काम करतोय असं वाटत नाही आहे आणि जसं जसं आम्ही अजून सोबत चित्रीकरण करू आमचं बॉण्डिंग अजून स्ट्रॉंग होईल.
होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या वेळी माझी मुलगी आदेश बांदेकर यांना म्हणाली की, माझे बाबा मला सांगतात होम मिनिस्टरसारखे कार्यक्रम बघत जाऊ नकोस. कोपरखळी म्हणण्यापेक्षा तिने मला तोंडावर उपडी पाडलं असं मी म्हणू शकतो.
चित्रीकरणाच्या दरम्यान खूपच मजेशीर किस्से घडतात. आम्ही राहुल देशपांडे यांच्या सोबत एक एपिसोड शूट करत असताना त्याच्या मुलीला सायकल चालवायची होती आणि ती इतकी इनोसंट आहे की तिला चित्रीकरण होतंय याच भानच नव्हतं ती कॅमेरासमोरून सायकल चालवत होती. असे अनेक मजेशीर किस्से प्रेक्षक या कार्यक्रमात पाहू शकतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.