आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालबागच्या राजाच्या दागिन्यांचा १.९ कोटींत लिलाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- प्रसिद्ध गणराय लालबागच्या राजाला यंदा त्याच्या भक्तांनी गणेशाेत्सवात दान केलेल्या सोन्या- चांदीचे दागिने आणि वस्तूंचा शुक्रवारी जाहीर लिलाव करण्यात आला. त्या लिलावातून लालबागच्या राजा मंडळाला तब्बल १ कोटी ९ लाख रुपयांची अर्थप्राप्ती झाली आहे. 


'राजा'ला यंदा त्याच्या एका अनाम भक्ताने सोन्याची १ किलो २७१ ग्रॅमची गणेशमूर्ती दान केली होती. ती ३५ लाख ७५ हजार रुपयांत दुसऱ्या एका भक्ताने घेतली. या मूर्तीच्या मुकुटात हिरा आहे. हा हिरा अंदाजे १ लाख रुपयांचा आहे. एक सोन्याची वीटही दानपेटीत अाली होती. तिचा लिलाव ३१ लाख २० हजार रुपयांना झाला. एका भक्ताने दान केलेले रोलेक्स घड्याळ दुसऱ्या भक्ताने ४ लाख रुपयांत लिलावात घेतले आहे. 


यंदा लालबागच्या राजाला ५ किलो ५०० ग्रॅम सोने आणि ७५ किलो चांदी दान करण्यात आली होती. त्यात ७५ सोन्याचे आणि ५० चांदीचे दागिने हाेते. दागिन्यांव्यतिरिक्त यंदा राजाच्या दानपेटीत ६ कोटी ५० लाखांची रोकड प्राप्त झाली आहे. 


देणगी तसेच लिलावातून आलेली रक्कम समाजकार्यासाठी खर्च करणार 
मागच्या वर्षी लालबागच्या राजाच्या दागिन्यांच्या लिलावातून गणेश मंडळाला ९८ लाख रुपये मिळाले होते, तर मंडळाचे एकूण वार्षिक उत्पन्न ७ कोटी इतके झाले होते. यंदा रोकड आणि दागिने मिळून राजाचे उत्पन्न ७ कोटी ५० लाखांवर पोहोचले आहे. लिलावातून येणारा सर्व पैसा सामाजिक कार्यासाठी वापरला जाणार आहे. १९८५ पासून हा लिलाव करण्यात येतो. लिलावातून येणाऱ्या पैशातून गरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यात येतो. राजाच्या उत्पन्नात दरवर्षी ७ ते १० टक्के वाढ होत आहे. २००८ मध्ये राजाला सर्वाधिक म्हणजे ११ कोटी ५० लाख इतके वार्षिक उत्पन्न मिळाले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...