आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिले कृष्णवर्णीय ऑलिम्पियन धावपटू जॅक यांच्या पदकांचा लिलाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ऑलिम्पिक स्पर्धेत इंग्लंडला पदक मिळवून देण्याचा माेठा पराक्रम जॅक लंडनन यांनी केला हाेता. तेव्हा जॅक हे ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारे पहिले कृष्णवर्णीय धावपटू ठरले हाेते. त्यांनी १९२८ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत १०० मी.मध्ये राैप्य आणि चार बाय १०० मीटर रिलेमध्ये कांस्यपदकाची कमाई केली हाेती. या दाेन पदकांसह त्यांच्या अव्वल कामगिरीमुळे पदक देण्यात आले हाेते.  याच पदकांचा लिलाव हाेणार आहे. या राैप्यला जॅक यांच्या काका यांनी वरून साेन्याचा मुलामा दिला हाेता. रिलेत वापरलेल्या बॅटनचाही यादरम्यान लिलाव हाेईल.
१९२८  मध्ये विश्वविक्रमाची बराेबरी 

> १९०५  जॅक यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला  हाेता. १९६६ मध्ये त्यांचे निधन झाले.

> १९२८  ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये त्यांनी १०.६ सेकंदांची धाव घेत विश्वविक्रमाची बराेबरी साधली हाेती.

> १९३२  मध्ये निवृत्तीनंतर ते पियानाे प्लेअर बनले. अनेक अल्बममध्ये  पियानाे वाजवला.

बातम्या आणखी आहेत...