आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'चिऊचे घर मेणाचे' नाट्यप्रयोगाने प्रेक्षक झाले सुन्न

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड : महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरीच्या अकराव्या दिवशी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा नांदेडच्या वतीने नाथा चितळे लिखित, अपर्णा नेरलकर दिग्दर्शित चिऊचे घर मेणाचे या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण झाले. या नाटकाने प्रेक्षकांच्या संवेदना जागृत तर केल्याच पण नाटकातील प्रसंगांनी त्यांचे मन सुन्न झाले.

स्त्रियांवरील मानसिक, शारीरिक अत्याचारावरील भाष्य करणारे हे नाटक रसिक प्रेक्षकांना सुन्न करून जाते. बलात्कार ही एकच घटना तिला वेग वेगळ्या अंगांनी गुंफून शब्दांत अाेतलेले हे कथानक. दिग्दर्शक अपर्णा नेरलकर यांनी आशयानुरूप दृश्य रचना करून हा विषय प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या कथानकात वडिलांच्या मित्रांकडून झालेल्या असह्य अत्याचाराची बळी ठरलेली चिमुरडी, प्रियकराकडून फसवून नाकारलेली युवती, तथाकथित पांढरपेशा समाजाचे संरक्षक असल्याचा दावा करणाऱ्या पुरुषांकडून मग ते मंत्री असतील, पोलिस असतील, मुकादम, शेतमालक, अन्य सामजिक धुरा सांभाळणाऱ्या नेतृत्वाकडून झालेल्या गँग रेप ला समोर गेलेली स्त्री, आपल्या नवऱ्याकडून होणाऱ्या अत्याचाराची कोंडी सहन करणारी पत्नी या सर्वांनी कुठे ना कुठे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावताना अत्यल्प स्त्रियांचा समावेश जाणवतो, पण बहुतांश महिला या मरणप्राय यातनांसह कुढत कुजत जगतात. तर काही आत्महत्येचा मार्ग अवलंबतात. नवीन पिढीने फिनिक्स पक्ष्यासारखे यातून बाहेर कसे पडावे, याचे यथार्थ दर्शन चिऊचे घर मेणाचे मध्ये घडवला आहे.

यातील कलावंत श्रुती बुयरे, अभिजित बारडकर, अनुराधा पांडे, गायत्री जोशी, डॉ. भारती मढवई, रागेश्री जोशी, सुफला बारडकर यांनी आपापल्या पात्रांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. तर वास्तवाचे आभास निर्माण करणारे वास्तववादी स्वरूपाचे नेपथ्य विवेक भोगले यांनी साकारले. तर अशोक माढेकर यांनी आशयानुरूप प्रकाशयोजना साकारली, रंगभूषा- अर्चना जिरवनकर, वेशभूषा- रश्मी वडवळकर, संगीत- कमलेश सारंगधर यांनी साकारले.
'चिऊचे घर मेणाचे' या नाटकातील एक दृश्य.