आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑडीची ई-ट्रॉन एका चार्जमध्ये 400 किमी जाईल, 100 किमी गती 3.5 सेकंदांत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजलिस- अमेरिकेतील लॉस एंजलिसमध्ये ३० नाेव्हेंबरपासून वाहन प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. या १११ वर्षांची परंपरा असलेल्या प्रदर्शनाचे तंत्रज्ञान हेच वैशिष्ट्य आहे. या वेळी इलेक्ट्रिक कार केंद्रस्थानी आहेत. आतापर्यंत जितक्या कारचे प्रदर्शन झाले त्यानुसार २०२० पर्यंत कमीत कमी १०० इलेक्ट्रिक कार बाजारात येतील. हे प्रदर्शन ९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. याची सुरुवात १९०७ मध्ये झाली होती. पहिल्याच वर्षी ९९ कार प्रदर्शित झाल्या होत्या. 

 

ऑडी ई-ट्रॉन जीटी 
ही पूर्णपणे इलेक्ट्रिक सुपर कार आहे. ही दोन वर्षात बाजारात येणार असल्याचा ऑडीचा दावा आहे. हिच्या पुढे आणि मागे एक्सलवर दोन वेगवेगळ्या इलेक्ट्रिक मोटारी आहेत, ज्या ५९९ एचपी (४३४ किलोवॅट)च्या बरोबरीत पॉवर देतात. ही ३.५ सेकंदांत १०० किमीची गती पकडू शकते. या कारची कमाल गती २४० किलोमीटर आहे. एका वेळेस केलेल्या चार्जमध्ये ४०० किलोमीटरपर्यंत जाईल.

 

पुढील स्लाइडवर पाहा- पोर्शे ९९२ : ही स्पोर्ट्स कार

 

बातम्या आणखी आहेत...