• Home
  • National
  • Augusta Westland scam: IT Department attaches Rs 254 crore 'benami' equity shares Kamal Nath Nephew Ratul Puri

Income tax action / ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा : प्राप्तीकर विभागाने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भाच्याकडील 254 कोटी रुपयांचे बेनामी शेअर केले जप्त

रतुल पुरी यांच्या ऑप्टिमा इंफ्रास्ट्रक्चर प्रा.लि.मध्ये एफडीआय द्वारे केली होती गुंतवणूक
 

दिव्य मराठी

Jul 30,2019 03:41:10 PM IST

नवी दिल्ली - प्राप्तीकर विभागाची देशभरात छापेमारी सुरु आहे. अनेक मोठे नेते व त्यांच्या नातेवाईकांकडील बेहेशी मालमत्ता प्राप्तीकर विभाग जप्त करत आहे. अशातच मंगळवार (दि.30 जुलै) रोजी आयकर विभागाने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरी यांचे 254 कोटी रुपयांचे बेनामी शेअर्स जप्त केले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की बेनामी प्रॉपर्टी ट्रांजेक्शन अॅक्ट अंतर्गत रतुल यांच्या नावावारील बेनामी शेअर्स जप्त करण्याची प्रोव्हिजनल ऑर्डर जारी केली होती. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ही रक्कम ऑप्टिमा इंफ्रास्ट्रक्चर प्रा.लि. मध्ये एफडीआय गुंतवणूकीद्वारे मिळवली होती. एचईपीसीएल कंपनीच्या नावे त्यांनी सौर पॅनल आयात करण्यासाठी ज्यास्त चालान बनवले आणि त्याद्वारे 245 कोटी रुपयांची कमाई केली. ही रतुल यांची एक शेल कंपनी आहे. राजीव सक्सेना दुबईतून ही कंपनी सांभाळत होता. राजीव सक्सेना ऑगस्टा वेस्टलँड (हेलिकॉप्टर) घोटाळ्यातील आरोपी असून ईडीच्या ताब्यात आहे.

यापूर्वी ईडीने सोमवारी दिल्ली कोर्टात सांगतिले होते की, रतुने यांनी ऑगस्टा वेस्टलँड वीवीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यात रक्कम मिळवली होती. ईडीने विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांच्या अंतर्गत अंतरिम जामीन याचिका सुनावानी दरम्यान हा आरोप केला होता. न्यायालयाने रविवारी रतुला यांच्या अटकेवर एका दिवसासाठी स्थगिती दिली होती.


29 ऑगस्टपर्यंत अटक करण्याबाबत स्थगिती दिली होती
हिंदुस्तान पावरप्रोजेक्ट्स प्रा. लि चे चेअरमन रतुल पुरी यांनी 27 जुलै रोजी या प्रकरणात अंतरिम जामिनाची मागणी केली होती. यामुळे 29 जुलैपर्यंत त्यांच्या अटकेला स्थगिती देण्यात आली होती. पुरी यांच्याकडून खटला लढत असलेले वकील एएम सांघवी यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी भाजपचे दोन खासदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यामुळे आता ईडीला त्यांना अटक करायची आहे कारण त्यांचे मामा हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत.


कमलनाथ यांच्या बहिणीचे सुपुत्र आहेत पुरी
रतुल हिंदुस्तान पावर प्रोजेक्ट्स प्रा.लि.चे अध्यक्ष आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांची याअगोदर चौकशी करण्यात आली होती. ते नीता आणि दीपक पुरी यांचे चिरंजीव आहेत. दीपक ऑप्टिकल मोजरवेअरचे सीएमडी आहेत. तर नीता या कमलनाथ यांच्या भगिनी आहेत.


3600 कोटींचा हेलिकॉप्टर करार रद्द झाला होता
यूपीए सरकारच्या काळात व्हीव्हीआयपींसाठी 3600 कोटी रुपयांत ऑगस्टपर्यंत हेलिकॉप्टरचा करार झाला होता. यानंतर भ्रष्टाचार आणि लाचलुचपतीच्या आरोपांमुळे हा करार रद्द करण्यात आला. ईडी आणि सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपास यंत्रणांनी याप्रकरणी अनेक आरोपपत्र दाखल केलेले आहेत.

X