Accident / शेगावला जाताना भरधाव कार उलटून औरंगाबादचे तिघे ठार, मृतांमध्ये दोन शिक्षक

औरंगाबाद येथून शेगावला दर्शनासाठी जाताना भरधाव कार उलटून झालेल्या अपघातात चालकासह ितघांचा मृत्यू झाला

Aug 24,2019 08:41:00 AM IST

खामगाव - औरंगाबाद येथून शेगावला दर्शनासाठी जाताना भरधाव कार उलटून झालेल्या अपघातात चालकासह ितघांचा मृत्यू झाला, तर दोन महिला गंभीर जखमी आहेत. शुक्रवारी रात्री खामगाव-चिखली रोडवरील अंत्रज फाट्यानजीक हा अपघात झाला. दोन जखमी महिलांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत.


औरंगाबादेतील जाधववाडी भागात राहणारे व गणोरी (ता. फुलंब्री) जिल्हा परिषद शाळेवरील कार्यरत शिक्षक हरी बारकू सोनवणे (५५), सूर्यभान कानू गोरे (४०), कांताबाई हरिभाऊ सोनवणे व उषा सूर्यभान गोरे हे शुक्रवारी रात्री शेगावकडे कारने निघाले. ही कार राजेंद्र भिकनदास वैष्णव (३५, रा. हसनाबाद, ता. भोकरदन) चालवत होता. रात्री २ च्या सुमारास कार निघाली. मात्र, खामगावनजीकच्या अंत्रज फाट्याजवळ चालक वैष्णव याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार उलटली. यात हरी सोनवणे आणि सूर्यभान गोरे यांचा जागीच मृत्यू झाला.चालक राजेंद्र वैष्णव, कांताबाई सोनवणे आणि उषा गोरे हे गंभीर जखमी झाले. त्यांना अकोला येथे हलवण्यात आले. दरम्यान, गंभीर जखमी चालक राजेंद्र वैष्णव याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

X